Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनगणना २०२७ चा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णत्वाकडे ...

जनगणना २०२७ चा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णत्वाकडे घर सूचीकरण व घर गणनेसाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागावर प्रशासनाचा भर

पिंपरी, दि. ९ जून २०२६ :जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या घर सूचीकरण व घर गणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे.

 

 

 

देशातील सर्वात मोठा लोकसहभागाचा उपक्रम असलेल्या जनगणनेद्वारे लोकसंख्या, निवास व्यवस्था, शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक व आर्थिक स्थितीविषयीची माहिती संकलित केली जाते. याच माहितीच्या आधारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा आणि विकास आराखड्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक घराची अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, जनगणना ही देशाच्या विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती प्रामाणिकपणे व अचूकपणे उपलब्ध करून द्यावी. जनगणनेतून प्राप्त होणारी माहिती भविष्यातील विकास धोरणे आणि सार्वजनिक सुविधांच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे उर्वरित कालावधीत प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा.

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार म्हणाले, घर सूचीकरण व घर गणनेच्या पहिल्या टप्प्याची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस उरले आहेत. ज्या नागरिकांची माहिती अद्याप नोंदविण्यात आलेली नाही, त्यांनी जनगणना कर्मचाऱ्यांशी सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. जनगणनेचे यश हे नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे.

 

 

 

जनगणना कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी आवश्यक माहिती तत्परतेने उपलब्ध करून देत या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

 

“आपली जनगणना, आपला विकास” या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाचा सहभाग देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महापा

लिकेने नमूद केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments