अब होगा हिसाब’ 18 जूनपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत पाहता येणार ~
ट्रेलरची लिंक – https://youtu.be/SheGCwdZ8vM
मुंबई, भारत – 12 जून 2026 : भारतातील आघाडीची मोफत, प्रीमियम आणि जाहिरात-आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असलेल्या ॲमेझॉन एमएक्स प्लेअरने आपल्या बहुप्रतीक्षित ‘अब होगा हिसाब’ या ओरिजिनल सूडकथेवर आधारित सारिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. पंजाबच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही सीरिज बॉबी आणि बंटी मनोचा या दोन भावांच्या आयुष्याभोवती फिरते. एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतो. “आपल्या माणसांसाठी तुम्ही कोणती पातळी गाठू शकता?” हा या सीरिजमधील मध्यवर्ती प्रश्न आहे. आरे स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सीरिजमध्ये संजय कपूर आणि शाहीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत मौनी रॉय, अविनाश मिश्रा, निमृत कौर अहलुवालिया, हरमन सिंघा आणि आशीमा वर्दान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘अब होगा हिसाब’ ही सीरिज 18 जूनपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत स्ट्रीम होणार आहे.
शाहीर आणि अविनाश मिश्रा यांनी साकारलेल्या बॉबी आणि बंटी मनोचा या दोन भावांची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आपल्या धाकट्या भावाला चांगले भविष्य मिळावे यासाठी बॉबी त्याला परदेशात पाठवण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र हे स्वप्न लवकरच भयानक वळण घेते. गूढरीत्या लोक बेपत्ता होण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, संजय कपूर यांनी साकारलेला प्रभावशाली गोल्डी बंटीला एक आकर्षक संधी देतो. त्यानंतर बंटी अचानक बेपत्ता होतो आणि अशा रहस्यमयरीत्या गायब होणाऱ्या लोकांच्या वाढत्या यादीत त्याचेही नाव समाविष्ट होते. संशय, फसवणूक आणि खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकलेल्या बंटीला वाचवण्यासाठी बॉबीची धडपड सुरू होते आणि त्याच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. गुपिते उलगडत जातात आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. अशा वेळी आपल्या भावाला वाचवण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी बॉबी किती मोठे धोके पत्करेल, हा प्रश्न सीरिजमध्ये उभा राहतो.
ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, “’अब होगा हिसाब’ ही भावांमधील नाते, सूड आणि त्यामधील गुंतागुंतीच्या भावनांची प्रभावी कथा आहे. संजय कपूर, शाहीर, मौनी रॉय, अविनाश मिश्रा आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरिज अधिक प्रभावी झाली आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेअरमध्ये आम्ही भारताच्या मातीत रुजलेल्या आणि देशभरातील प्रेक्षकांशी जोडल्या जाणाऱ्या कथा मोफत स्वरूपात सादर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘अब होगा हिसाब’ ही त्याच वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. वास्तवदर्शी कथनशैली आणि सर्वांना भावणाऱ्या विषयांची सांगड या सीरिजमध्ये घालण्यात आली आहे. या सारिजचा ट्रेलर सादर करताना आम्हाला आनंद होत असून, प्रेक्षकांनी या रोमांचक प्रवासाचा अनुभव घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.”
या सारिजकडे आकर्षित होण्यामागील कारण सांगताना गोल्डीची भूमिका साकारणारे संजय कपूर म्हणाले, “’अब होगा हिसाब’मधील व्यक्तिरेखांची खोली आणि त्याचे गुंतागुंतीचे कथाविश्व यामुळे मी या सीरिजकडे आकर्षित झालो. या सीरिजमधील मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे नाती आणि भावबंध यांचे अतिशय सुंदर चित्रण. ही कथा अनेक स्तरांनी समृद्ध, अनपेक्षित घडामोडींनी भरलेली आणि सतत नवे वळण घेणारी आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेअरसोबत पुन्हा एकदा काम करताना मला आनंद होत आहे. या सीरिजमध्ये दडलेले अनेक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील, याची मला उत्सुकता आहे.”
बॉबी या आपल्या व्यक्तिरेखेबद्दल आणि कथेच्या भावनिक गाभ्याविषयी बोलताना शाहीर म्हणाला, “बॉबीच्या व्यक्तिरेखेकडे मला सुरुवातीपासून आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची आपल्या प्रिय व्यक्तींप्रती, विशेषतः भावाप्रती असलेली अढळ निष्ठा. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास तो तयार असतो आणि हीच भावना मालिकेतील त्याच्या प्रत्येक निर्णयामागील प्रेरक शक्ती ठरते. हा प्रवास साकारताना मला खूप समाधान मिळाले. भावना, नाट्य आणि तीव्रतेने परिपूर्ण अशा या कथेसाठी ॲमेझॉन एमएक्स प्लेअरसोबत काम करताना मला आनंद होत आहे. प्रेक्षकांनी या रोमांचक कथाविश्वाचा अनुभव घ्यावा आणि बॉबीचा प्रवास उलगडताना पाहावा, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
अविनाश मिश्रा आपल्या ओटीटी पदार्पणाबाबत म्हणाला, “बंटी ही व्यक्तिरेखा अनेक पैलूंनी समृद्ध आहे. या व्यक्तिरेखेला भावनिक खोली आणि संवेदनशीलता असल्यामुळे ही भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप समाधानकारक अनुभव होता. संजय सर, निम्रित आणि शाहीर यांच्यासोबत काम करताना खूप छान अनुभव मिळाला. त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी अधिक संस्मरणीय ठरला. ओटीटीवरील माझे पदार्पण आणि ॲमेझॉन एमएक्स प्लेअरसोबतचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे ही सीरिज माझ्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. प्रेक्षकांनी बंटीचा प्रवास आणि या सीरिजचे कथाविश्व अनुभवावे, यासाठी मी उत्सुक आहे.”
आरे स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमित शर्मा म्हणाले, “‘अब होगा हिसाब’ ही नातेसंबंध, निष्ठा आणि आयुष्याला आकार देणाऱ्या निवडींचा वेध घेणारी भावनिक कथा आहे. प्रतिभावान कलाकार आणि उत्कृष्ट तांत्रिक टीम यांच्या योगदानामुळे ही कथा प्रभावीपणे साकार झाली आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेअर आणि या सीरिजच्या सर्जनशील टीमसोबत काम करताना आम्हाला आनंद झाला. या सहकार्यामुळे ही कथा वास्तवदर्शी आणि व्यापक स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणणे शक्य झाले. 18 जून रोजी सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
‘अब होगा हिसाब’ ही सीरिज 18 जूनपासून केवळ ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत स्ट्रीम होणार आहे. मोबाइल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडीओ, फायर टीव्ही, जिओटीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्री
म या माध्यमांवर ती पाहता येईल.


