पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजना अंतर्गत दि.२६/१२/२०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा “हयातीचा दाखल्या” बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणेत येत आहे. सदर सर्वेक्षणाची मुदत दि.२६/०२/२०२४ रोजी संपलेली होती, ती दि.२७/०२/२०२४ पासून दि.२६/०३/२०२४ पर्यंत सदर सर्वेक्षणाला मुदत वाढ देणेत आलेली आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अश्या लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यालयात सादर करावा याबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देणेत आलेली होती. प्रत्यक्ष सर्वेक्षणचे कामकाज चालू असताना असे निर्देशनास आले आहे की, अद्याप पर्यंत जवळपास १४००-१५०० लाभार्थ्यांचे राहण्याचे पत्ते अपूर्ण असून मोबाईल नंबर बंद, चूकीचे नंबर आहेत असा सदर संस्थेने अहवाल दिलेला आहे.
तरी ज्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला आहे व आज अखेर ज्यांच्याशी संपर्क झालेला नाही पण दिव्यांग योजनेचा लाभ घेतात अश्या सर्व लाभार्थ्यांना अवाहन करणे येते की, अश्या लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग, मुख्य कार्यालयात सादर करावा अन्यथा अश्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगित केला जाईल याची दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
लाभार्थ्यांनी तात्काळ प्रकटनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेला सहकार्य करावे असे अवाहन श्री. श्रीनिवास दांगट, सहा. आयुक्त, (दिव्यांग कक्ष) समाज विकास विभाग यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “हयातीचा दाखला” घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणेबाबत…
RELATED ARTICLES


