Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedअन् उलगडला पुण्यातील प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा इतिहास संशोधक मंदार लवाटे :...

अन् उलगडला पुण्यातील प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा इतिहास संशोधक मंदार लवाटे : संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘पुण्यातील मंदिरांचा इतिहास’ व्याख्यानाचे आयोजन

पुणे : चौथ्या शतकातील पाताळेश्वर मंदिरापासून ते हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या कसबा गणपती, नागेश्वर, सोमेश्वर, केदारेश्वर आणि भव्य ओंकारेश्वर मंदिरापर्यंतचा पुण्याचा धार्मिक वारसा अनेक अनोख्या इतिहासकथा सांगतो. जुन्या पेठांमध्ये विखुरलेली शेकडो मंदिरे, त्यामागील आख्यायिका, पेशवेकाळातील त्यांचा विकास आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक ऐतिहासिक नोंदींचा वेध घेत इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी पुण्यातील प्राचीन मंदिरांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविले. चार इंचांपासून ते दहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा समावेश असलेल्या जुन्या पुण्यातील मंदिरांचा समृद्ध वारसा त्यांनी उलगडून दाखविला.

 

संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने इतिहास अभ्यासक तथा श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग-पर्वती-कोथरूडचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे ,सुधीर पंडित , रमेश भागवत, विजय पानवलकर, संग्रामबापू भंडारे, संकेत गदादे आणि छाया गदादे उपस्थित होते. कार्यक्रमात विजय पानवलकर लिखित ‘बाजीराव द ग्रेट’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

 

मंदार लवाटे म्हणाले, पुण्यातील नागेश्वर मंदिर हे शहरातील अतिप्राचीन शिवमंदिरांपैकी एक असून त्याचा पेशवेकाळात जीर्णोद्धार करण्यात आला. हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने मानले जाते. पूर्वी या परिसरातून वाहणाऱ्या ‘नाग’ प्रवाहावरून या मंदिराला नागेश्वर हे नाव पडल्याचे मानले जाते.

 

पुण्यातील सर्वांत प्राचीन मंदिरांमध्ये पाताळेश्वर मंदिराचे स्थान विशेष आहे. दगडात कोरलेले हे मंदिर चौथ्या शतकातील असल्याचे मानले जाते. तसेच धारेश्वर मंदिराचा नेमका कालखंड निश्चित करणे कठीण असले, तरी तेही प्राचीन वारसा जपणारे महत्त्वाचे मंदिर आहे. पाषाण येथील सोमेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते.

 

पुणे आणि परिसरात सर्वाधिक मंदिरे भगवान शंकराची असून त्यानंतर मारुती मंदिरांची संख्या मोठी आहे. विविध देवदेवतांच्या मंदिरांमुळे पुण्याची धार्मिक ओळख अधिक समृद्ध झाली आहे. पेशव्यांच्या काळात अनेक मंदिरांना आश्रय, दक्षिणा आणि आर्थिक मदत देण्यात आली. त्यामध्ये केदारेश्वर मंदिर, कसबा गणपती आणि सोमेश्वर मंदिर यांचा समावेश होता.

 

कसबा गणपती मंदिर हे सुमारे हजार वर्षांचा इतिहास लाभलेले मंदिर मानले जाते. कसबा पेठ परिसरात विविध देवतांची मंदिरे असून एका परिसरात अनेक देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.

 

पुण्यात खंडोबाची सुमारे दहा मंदिरे असून त्यामध्ये धायरी येथील खंडोबा मंदिर सर्वांत प्राचीन मानले जाते. याशिवाय पुण्यात नारद मुनी आणि व्यास मुनी यांची मंदिरेही आहेत. बारा ज्योतिर्लिंगांमध्येही सहज पाहायला मिळणार नाही अशी भव्यता लाभलेले ओंकारेश्वर मंदिर हे पुण्याच्या धार्मिक वैभवाचे प्रतीक आहे. तसेच रणछोडदास मंदिर हेही शहरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

 

पुण्यातील बहुतांश मंदिरे ही लोकांच्या श्रद्धेतून उभी राहिली आहेत. केवळ जुन्या पेठांमध्येच सुमारे ३०० ते ४०० मंदिरे आढळतात. चार इंचांपासून ते दहा फूट उंचीपर्यंतच्या विविध आकारांच्या मूर्ती या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, सुमारे ८० टक्के मंदिरे नेमकी कोणी उभारली, याची ठोस माहिती आज उपलब्ध नाही.

 

ते पुढे म्हणाले, मंदिरे ही केवळ पूजा-अर्चनेची स्थळे नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची जिवंत स्मारके आहेत. आपल्या धर्माचा आणि परंपरेचा महत्त्वाचा वारसा त्यांच्यात जतन झालेला आहे. जसे शरीराला ऊर्जेसाठी चार्जिंगची गरज असते, तसेच मन आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरात जाणे आवश्यक आहे. समाजाला अध्यात्मिक बळ आणि संस्कार देण्यासाठीच मंदिरांची निर्मिती झाली आहे.

 

जगन्नाथ लडकत म्हणाले, पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी आम्ही नियमितपणे ऐतिहासिक व्याख्यानांचे आयोजन करतो. पुण्याचे महत्त्व आणि वैभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच ही सांस्कृतिक चळवळ अखंडपणे सुरू राहावी, यासाठी हा प्रयत्न आहे. इतिहास, संस्कृती आणि परंपरांविषयी जनजागृती निर्माण करणे हे या उपक्रमामागचे प्रमुख उ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments