Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे ‘समर्थ पॅरा स्पोर्ट्स प्रोग्राम’...

ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे ‘समर्थ पॅरा स्पोर्ट्स प्रोग्राम’ २०२६-२७ साठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात

पुणे, १९ जून २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहयोगाने आणि ‘समर्थ बाय ह्युंदाई’ या उपक्रमांतर्गत समर्थ पॅरा स्पोर्ट्स प्रोग्राम २०२६-२७ वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतातील पॅरा-ॲथलीट्सना सक्षम करण्याच्या उद्देशाने राबवला जाणारा, हा उच्च-क्षमता असलेला क्रीडा सहाय्य उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक ते सर्वसमावेशक मार्गदर्शन व संसाधने उपलब्ध करून दिली जातात. समर्थ पॅरा स्पोर्ट्स प्रोग्राम अंतर्गत सुरुवातीपासूनच पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा स्विमिंग, पॅरा आर्चरी, व्हीलचेअर टेनिस आणि पॅरा कॅनो या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना वैयक्तिक गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या सहाय्य प्रणालीद्वारे पाठबळ दिले जात आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments