Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू...

सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू यांचे आकस्मिक निधन

मुंबई, महाराष्ट्र दि. १९ जून २०२६ : आयुर्वेद औषध निर्मिती क्षेत्रात गौरवशाली परंपरा लाभलेल्या सुप्रसिद्ध कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक, ५९ वर्षीय श्री. उमेश सांडू यांचे आज, शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता चेंबूर येथील त्यांच्या घरी आकस्मिक निधन झाले.

 

 

 

श्री. उमेश सांडू यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली. गोवा येथील कंपनीचा औषधनिर्माण कारखाना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. औषधनिर्माण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचे मोठे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे औषधनिर्माण क्षेत्रासह सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली शिवानी आणि कनिष्का, आई, दोन भाऊ, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार आहे.

 

 

 

श्री. उमेश सांडू यांची अंतिम यात्रा उद्या, शनिवार दि. २० जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता सांडू कंपाऊंड, सांडू वाडी, चेंबूर, मुंबई येथून निघणार

आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments