पुणे, दि. १९: (जिमाका, वृत्तसेवा): पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नव्याने सुरू होणाऱ्या ‘एमएच१२झेडव्ही’वाहन मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता २० जून २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून फेसलेस सेवा सुरू होणार आहे. ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाहीत.
यासेवेद्वारे नागरिकांनी घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून क्रमांक आरक्षित करता येणार आहे. अर्जदार आधारसंलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपीद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000


