Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकल महिला धोरणासंबंधी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन*

एकल महिला धोरणासंबंधी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन*

 

 

पुणे, दि. 22: जिल्हयातील विधवा, घटस्पोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिला यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने २३ जून रोजी सकाळी ११ वाजता शरदचंद्रजी सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद, पुणे येथे एकल महिला धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

 

जिल्हयातील विधवा, घटस्पोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिला यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्यावतीने ‘स्वतंत्र एकल महिला धोरण’ तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच २३ जून हा एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या कार्यशाळेत रोजगारांच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा, अपेक्षित नवीन योजना, कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा, महिलांची सुरक्षा आणि सहभाग वाढविण्यासंदर्भात सूचना लिखित स्वरुपात सादर करण्यात येणार आहे. एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करतांना या सूचना व अभिप्रायांचा विचार करण्यात येणार आहे. एकल महिलांच्या समस्यावर शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरु कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत आदीबाबत अभिप्राय jimbapune@gmail.com वर पाठविण्यात यावेत.

 

या कार्यशाळेच्या माध्यमातून एकल महिला, स्वंयसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषय तज्ज्ञांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यशाळेस एकल महिला, स्वंयसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषय तज्ज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments