पुणे, दि. : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क व विश्रांतवाडी, पुणे येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ (बिगर व्यावसायिक) महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना वसतिगृहात विनामूल्य निवास, भोजन व बेडिंग साहित्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, शैक्षणिक सहलीसाठी आर्थिक सहाय्य आणि दरमहा निर्वाह भत्त्याचाही लाभ देण्यात येतो.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
000


