Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमर्यादांवर मात करण्याचे एक दशक: हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीने जागतिक रॅली रेसिंग...

मर्यादांवर मात करण्याचे एक दशक: हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीने जागतिक रॅली रेसिंग एक्‍सलन्‍सची १० वर्षे साजरी केली ॲमॉरी स्पोर्ट ऑर्गनायझेशनसोबतची भागीदारी ५ वर्षांनी वाढवली आणि इंडियाज नेक्स्ट डकार हिरो प्रोग्राम लाँच केला

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल आणि स्कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने जयपूर येथील आपल्या सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी)मध्ये हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीचा १०वा वर्धापनदिन साजरा केला. हा सोहळा जागतिक रॅली रेसिंगच्या मंचावर भारताच्या एका दशकाच्या दैदिप्यमान प्रवासाचा साक्षीदार ठरला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी २०२४ एफआयएम वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियन (डब्ल्‍यू२आरसी) रॉस ब्रँच, दक्षिण अमेरिकेचा नाचो कॉर्नेजो, दक्षिण आफ्रिकेचा रॅली-रेड आणि मोटोक्रॉस रायडर मायकेल डोर्टी, आणि भारताचा मोटोक्रॉस व सुपरक्रॉस रायडर श्लोक घोरपडे यांच्यासह भारताची पहिली प्रोफेशनल विमेन बाइकर सौम्या मोक्षा चौधरी यांसारखे दिग्गज रेसिंग स्टार्स एकत्र आले होते.

या इव्‍हेण्‍टला हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीचे मुख्य शिल्पकार, ज्यामध्ये कंपनीचे हेड ऑफ मोटोस्पोर्ट्स आणि टीम मॅनेजर वुल्फगँग (वाफी) फिशर, तसेच स्पॅनिश रॅली तज्ज्ञ आणि हेड ऑफ नॅशनल मोटोस्पोर्ट्स जॉर्डी ग्राउ यांचा समावेश होता, त्यांच्यासह डीलर्स, भागीदार आणि मोटोस्पोर्ट्स क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली दुसऱ्या दशकात पाऊल ठेवत असताना, कंपनीने आपल्या रॅली रेसिंग प्रवासाचे भविष्य बदलणाऱ्या तीन धोरणात्मक उपक्रमांची घोषणा केली. पहिला उपक्रम म्हणजे, कंपनीने आयकॉनिक डकार रॅली आणि एफआयएम वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिपचे आयोजक ॲमॉरी स्पोर्ट ऑर्गनायझेशनसोबत आपल्या भागीदारीचे नूतनीकरण केले. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाळ यांनी ‘इंडियाज नेक्स्ट डकार हिरो’ (आयएनडीएच) प्रोग्रामची घोषणा केली. भारतातील रॅली-रेड क्षेत्रामधील नेक्‍स्‍ट-जनरेशन टॅलेंटचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी डिझाइन केलेला हा अद्वितीय प्रोग्राम आहे. या घोषणांचा समारोप करताना, टीमने भारतातील उदयोन्मुख ऑफ-रोड रेसर श्लोक घोरपडेचे हिरो मोटोस्पोर्ट्स टीममध्ये अधिकृतपणे स्वागत केले.

कंपनीच्या जयपूर येथील अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्रात आयोजित या इव्‍हेण्‍टमध्‍ये हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीच्या डकार बाइक्स आणि रायडर्सचे विशेष प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यामध्ये टीमच्या स्टार रायडर्सनी सादर केलेल्या विशेष ऑफ-रोड कामगिरीचा समावेश होता. या चित्तथरारक प्रदर्शनाने उपस्थितांना त्या अथांग कौशल्य, सहनशीलता आणि जिद्दीची झलक दाखवली, ज्याने जगातील सर्वात कठीण रॅली मंचांवर हिरो मोटोस्पोर्ट्सचे हे ऐतिहासिक दशक घडवले आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्‍यक्त करत हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाळ म्हणाले, “गेल्या एका दशकात हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली एका धाडसी महत्त्वाकांक्षेतून विकसित होऊन जागतिक स्तरावर आदर मिळवणारी रॅली रेसिंग टीम बनली आहे, जी जागतिक मंचावर भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व करत आहे. हा मैलाचा दगड आमच्या भूतकाळातील यशाचा गौरव करतो आणि भविष्यासाठी आमचा दृष्टिकोन स्पष्ट करतो.

एएसओसोबत आमच्या भागीदारीचे नूतनीकरण जागतिक रॅली रेसिंगप्रती असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ करते. तसेच, इंडियाज नेक्स्ट डकार हिरो प्रोग्राममधून आमचा दृढ विश्वास दिसून येतो की, भारतात मोटो-स्पोर्ट्सची प्रचंड आणि सुप्त टॅलेंट आहे, ज्याचा शोध घेणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. श्लोक घोरपडेचे टीममध्ये स्वागत करून भारतातील रायडर्सना या स्‍पोर्टच्या सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शाश्वत मार्ग तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. एकत्रितपणे, हे उपक्रम भारतासाठी कायमस्वरूपी रॅली-रेड वारसा निर्माण करण्याच्या आमच्या प्रवासातील पुढील अध्याय आहेत.”

जगातील सर्वात कठीण भूप्रदेशांवर आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय रॅली सर्किटमध्ये भारताची उपस्थिती उंचावण्यासाठी २०१६ मध्ये हिरो मोटोकॉर्पद्वारे हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून या टीमने आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्सच्या सर्वोच्च पातळीवर, ज्यामध्ये डकार रॅली आणि एफआयएम वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिपचा समावेश आहे, स्पर्धा करत जगातील आघाडीच्या रॅली-रेड टीम्सपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या दशकात, टीमने अनेक वेळा पोडियम फिनिश (अव्वल तीनमध्ये स्थान) आणि ऐतिहासिक विजय मिळवले आहेत, ज्यामुळे जागतिक रॅली रेसिंगच्या नकाशावर भारताचे स्थान दृढ झाले आहे.

दीर्घकालीन जागतिक भागीदारी अधिक दृढ केली

रॅली-रेड रेसिंगच्या भविष्याप्रती असलेल्या आपल्या कटिबद्धतेचा भाग म्हणून हिरो मोटोकॉर्पने एएसओ (ॲमॉरी स्पोर्ट ऑर्गनायझेशन) सोबत भागीदारी ५ वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. या नूतनीकरण केलेल्‍या सहयोगामधून जागतिक स्तरावर या स्‍पोर्टला पुढे नेण्यासाठी आणि उदयोन्मुख रॅली टॅलेंटसाठी मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली आणि एएसओ यांच्यातील सामायिक कटिबद्धता दिसून येते.

‘इंडियाज नेक्स्ट डकार हिरो’ (आयएनडीएच) प्रोग्रामचा शुभारंभ

रॅली-रेड क्षेत्रातील एका दशकाचा प्रदीर्घ अनुभव आणि हिरो मोटोकॉर्पच्या यशस्वी राष्ट्रीय रेसिंग उपक्रमांच्या जोरावर हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीने ‘इंडियाज नेक्स्ट डकार हिरो’ (आयएनडीएच) प्रोग्राम लाँच केला. हा उपक्रम संरचित प्रवासाच्या माध्यमातून भारतातील आघाडीच्या तरुण ऑफ-रोड रेसिंग टॅलेंटचा शोध घेण्यावर, त्यांना प्रशिक्षित करण्यावर आणि त्यांना राष्ट्रीय रेसिंगपासून आंतरराष्ट्रीय रॅली-रेड मंचापर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या रायडर्सना दोन ते तीन वर्षांच्या कठोर विकास उपक्रमातून जावे लागेल, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅली रेसिंगच्या सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेले रायडिंग तंत्र, नेव्हिगेशन, शारीरिक सक्षमता आणि सहनशीलता प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाईल.

हा उपक्रम हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीच्या सध्याच्या रायडर विकास परिसंस्‍थेवर आधारित आहे, ज्यामध्ये नेक्‍स्‍ट-जनरेशन चॅम्पियन्‍स घडवण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी टीमच्या एका दशकाच्या जागतिक रॅली अनुभवाचा वापर केला जाईल. या प्रवासातील पहिला मैलाचा दगड सप्टेंबर २०२५ मध्ये गाठला गेला, जेव्हा राष्ट्रीय रेसिंग स्टार अरुण थायप्पाने स्पेनमधील सिएर्झो रॅलीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅली-रेड पदार्पण केले होते. हिरो ४५० रॅली प्रोटोटाइप बाइकसह त्याने केलेले हे पदार्पण भारतातील मोटरस्पोर्ट्ससाठी ऐतिहासिक क्षण ठरला.

श्लोक घोरपडेचा हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीमध्ये समावेश

दीर्घकालीन टॅलेंट विकास धोरणातील महत्त्वाचे पाऊल म्हणून हिरो मोटोस्पोर्ट्सने सातारा, महाराष्ट्र येथील १८ वर्षीय श्लोक घोरपडेला टीममध्ये सामील केले आहे. श्लोकने नॅशनल इंडिया सुपरक्रॉस सर्किटमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. त्याने उपलब्ध असलेली प्रत्येक प्रमुख विजेतीपदे पटकावली असून इंडिया सुपरक्रॉस लीगमध्ये सर्वात वेगवान राष्ट्रीय रेसर म्हणून कारकीर्द पूर्ण केली आहे. त्याच्या विकास उपक्रमाचा भाग म्हणून श्लोकने एफआयएम वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियन रॉस ब्रँच आणि हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीच्या मुख्य रायडर्ससोबत प्रशिक्षण सुरू केले आहे. डकार रॅलीच्या विशेष मार्गाचा भाग म्हणून तो सखोल रेस सिम्युलेशन उपक्रमात देखील सहभागी होणार आहे.

हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली दुसऱ्या दशकात पदार्पण करत असताना हे सर्व उपक्रम एकत्रितपणे भारतातील मोटरस्पोर्ट्सला पुढे नेण्यासाठी, जागतिक रॅली उपस्थिती वाढवण्यासाठी आणि जगातील सर्वोत्तम रायडर्सशी स्पर्धा करण्याकरिता भारतामध्‍ये रायडर्सची भावी पिढी घडवण्यासाठी हिरो मोटोकॉर्पची असलेली कटिबद्धता अधिक दृढ करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments