पुणे, दि. 24: महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय बारामतीबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 8 जुलै 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय बारामतीच्या कार्यक्षेत्रातील बारामती, इंदापूर, आणि दौंड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरुर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड या तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील तालुक्यांची संख्या 14 असून याकरिता जिल्हा पुणे असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.


