Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए आणि सीआयआय-वायआय यांच्यात सामंजस्य करार संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून...

बीएनसीए आणि सीआयआय-वायआय यांच्यात सामंजस्य करार संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चार कर्तृत्ववान महिलांचाही गौरव

पुणे, दि. २१ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन आणि देशातील व्यावसायिक धोरणांवर काम करणाऱ्या कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचा (सीआयआय) युवा विभाग (यंग इंडियन्स उर्फ वायआय) यांच्यात एक सामंजस्य करार झाला. बीएनसीएमध्ये स्थापन झालेल्या शाश्वतता व अध्यापन विकास संस्थेतर्फे (आयएसडीएस) आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तुत्त्व गाजविणाऱ्या मितल हिरेमठ, सुप्रिया बडवे, रचना रानडे आणि प्राजक्ता मांजरेकर या महिलांना गौरवण्यात आले.

यानिमित्त ‘नेतृत्त्व व उद्योजगतेत महिलांचे सबलीकरण’ या विषयावर विस्तृत विचार मंथन होताना ज्ञानाधिष्ठित तरुण महिलांमध्ये नेतृत्त्वगुण विकसित करणे हा यामागचा हेतू होता. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप तसेच सीआयआय-वाय आयचे प्रत्यूश सिन्हा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उद्योग आणि शिक्षण याबाबत बीएनसीएची नेहमीच खुली भूमिका असून या उद्योग आणि शिक्षण याबाबत बीएनसीएची नेहमीच खुली भूमिका असून या करारानुसार एक अर्थपूर्ण साहचर्य निर्माण होईल, अशी अपेक्षा डॉ. कश्यप यांनी व्यक्त केली. सीआयआयच्या पश्चिम विभागचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव यांच्या हस्ते वरील चार महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयएसडीएसचे प्रा. निधी दीक्षित, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, प्रा. नम्रता धामणकर आणि प्रा. पियुष गिरगावकर उपस्थित होते. स्नोव्हल क्रिएशन व वाय आय पुणेचे सहअध्यक्ष समीर धामणगावकर आणि वाय आय पुणे महिला विभाग प्रमूख व एसव्हीपी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष पारुल वैद्य यांनी यानिमित्त एका गटचर्चेत आयोजन केले असून अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

या सामंजस्य करारामुळे तरुणवर्गात नेतृत्त्वगुण विकसित करणे, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण, जबाबदार तरुणवर्ग घडवणे आणि भारतीय तरुणाईस एक भरभक्कम आवाज देणे शक्य होईल, असे आयएसडीएसच्या कार्यकारी संचालक प्रा. अस्मिता जोशी यांनी माहिती दिली.

सत्कारार्थी महिला मितल हिरेमठ यांनी मुलींनी त्यांच्यातील बदल हा घरापासूनच सुरू करण्याचे सुचवले, तर सुप्रिया बडवे यांनी महिलांचे वैयक्तिक व्यावसायिक जीवनातील समतोल साधण्यावर विवेचन केले. आर्थिक क्षेत्राबाबत बोलताना रचना रानडे यांनी नोकरी सोडलेल्या पतीबरोबरचा व्यवसाय कसा सांभाळला यावर माहती सांगितली. व्यवहारात पुरुष आणि स्त्रीमधील शक्तीचा सुयोग्य वापर करत आपले आयुष्य कशा पद्धतीने उन्नत करावे याबद्दल प्राजक्ता मांजरेकरांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments