मुंबई, 16 ऑक्टोबर, 2026: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने 13 ऑक्टोबर, 2026 रोजी मुंबईत एमएसएमई (MSME) ग्राहक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 200 हून अधिक एमएसएमई उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी झाले. एमएसएमई समुदायासोबत बँकेचा संवाद अधिक दृढ करणे आणि उद्योजकांना बँकेच्या सर्वसमावेशक आर्थिक उपाययोजना तसेच बँकिंग सेवांची माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक आणि एमएसएमई बँकिंग, को-लेंडिंग आणि सप्लाय चेन फायनान्स विभागाचे प्रमुख श्री. सुनील कुमार शर्मा; मुख्य महाव्यवस्थापक व मुंबई अंचल प्रमुख श्री. मधुर कुमार; ‘न्यू एमएसएमई बिझनेस’चे प्रमुख श्री. ध्रुबाशिष भट्टाचार्य; मुंबई अंचल चे महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) श्री. राजेश कुमार शर्मा; मुंबई मेट्रो मध्य क्षेत्राचे उप-महाव्यवस्थापक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. संजीव बन्सल आणि मुंबई मेट्रो दक्षिण क्षेत्राचे उप-महाव्यवस्थापक व क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. विमलेश झालानी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना, वरिष्ठ नेतृत्वाने नावीन्यपूर्ण आर्थिक उपाययोजना, सुलभ बँकिंग प्रक्रिया आणि तंत्रज्ञान-आधारित सेवांच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करण्याच्या बँक ऑफ बडोदाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी आर्थिक वाढीला चालना देण्यात, रोजगार निर्मिती करण्यात आणि भारताच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेत योगदान देण्यात एमएसएमई क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमात बँकेच्या एमएसएमई बँकिंग सोल्यूशन्सचा सर्वसमावेशक संच सादर करण्यात आला, ज्यामध्ये व्यवसायांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या पतपुरवठा सुविधा, वर्किंग कॅपिटल फायनान्स, व्यापार वित्तपुरवठा आणि डिजिटल बँकिंग सेवांचा समावेश आहे. या संवादात्मक सत्रामुळे उद्योजकांना अभिप्राय देणे, व्यवसायातील आव्हानांवर चर्चा करणे आणि योग्य आर्थिक उपाय शोधणे शक्य झाले, ज्यामुळे बँक आणि MSME समुदायामध्ये अर्थपूर्ण संवाद वाढण्यास प्रोत्साहन मिळाले.
अशा ग्राहक संपर्क उपक्रमांच्या माध्यमातून, बँक ऑफ बडोदा एमएसएमई (MSME) क्षेत्रासोबतचे आपले संबंध अधिक दृढ करत आहे. तसेच, उद्योजकांना सुलभ, तत्पर आणि सर्वसमावेशक बँकिंग उपाय उपलब्ध करून देऊन त्यांना पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता अधिक बळकट करत आहे, ज्यामुळे भारताच्या एमएसएमई परिसंस्थेच्या वाढीस आणि विकासास हातभार लाग
त आहे.
***


