Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमली पदार्थांची तस्करी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृतीची मोहीम राबविणार आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ‘नशामुक्त...

अमली पदार्थांची तस्करी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृतीची मोहीम राबविणार आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ‘नशामुक्त भारत अभियान’ची घोषणा

 

पुणे : अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही चिंतेची बाब असून, याविरोधात व्यापक जनजागृती आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर या मोहिमेची सुरुवात शुक्रवार, २६ जून २०२६ पासून पुण्यातील मराठवाडा महाविद्यालय येथे जनजागृती आणि पोस्टर मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे.

 

पत्रकार परिषदेला प्रकल्प समन्वयक निलेश शिंदे उपस्थित होते.

 

डॉ. अजय दुधाने म्हणाले, अमली पदार्थांचे व्यसन ही आता केवळ शहरी समस्या राहिलेली नसून त्याचा फटका पुणे शहरासह आसपासच्या परिसरातील कुटुंबांनाही बसत आहे. सहज उपलब्धता, मित्रपरिवाराचा दबाव आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अधिकाधिक तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. परिणामी कुटुंबे विस्कळीत होणे, शिक्षण अर्धवट सोडणे, मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होणे आणि किरकोळ गुन्ह्यांमध्ये वाढ होणे असे दुष्परिणाम समाजासमोर उभे राहत आहेत.

 

या अभियानांतर्गत अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध कठोर कारवाई, शाळा, महाविद्यालये आणि आयटी कंपन्यांमध्ये नियमित जनजागृती सत्रे, पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा, सरकारी व्यसनमुक्ती केंद्रांचा विस्तार, प्रत्येक शहर व तालुक्यात परवडणाऱ्या आणि गोपनीय उपचार सुविधांची उपलब्धता, तसेच स्थानिक स्तरावर ‘अमली पदार्थमुक्त क्षेत्र’ समित्यांची स्थापना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

 

याशिवाय गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सामुदायिक देखरेख व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार असून, संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षितपणे देण्यासाठी निनावी हेल्पलाईनची सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे अराजकीय दृष्टीकोनातून पाहून जिल्हास्तरावर संयुक्त कृती दल स्थापन करावे, असे आवाहनही करण्यात आले.

 

अमली पदार्थांमुळे गमावला जाणारा प्रत्येक तरुण हा समाजासाठी मोठा तोटा असून, या समस्येवर मात करण्यासाठी सर्व स्तरांवरील नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे डॉ. दुधाने यांनी यावे

ळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments