Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात...

रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 

 

पुणे, दि. २६ जून २०२६ : रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात नव्या नेतृत्वाच्या पदग्रहण सोहळ्याने उत्साहात झाली. रोटरी वर्ष २०२६-२७ साठी रोटेरियन विनायक गुळवणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासह नव्या संचालक मंडळाचाही पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट (डीजीई) रोटेरियन चारू श्रोत्री यांच्या हस्ते अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण विधी संपन्न झाला. यावेळी त्यांनी नव्या नेतृत्वाचे अभिनंदन करत, रोटरीच्या “सर्व्हिस अबोव्ह सेल्फ ” या ब्रीदवाक्यानुसार समाजहिताचे अधिकाधिक उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

सोहळ्याचे विशेष अतिथी, जीएसआर तथा माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (पीडीजी ) रोटेरियन रवी धोत्रे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून रोटरीच्या मूल्यांची जपणूक करत समाजात दीर्घकालीन परिणाम घडवून आणणारे प्रकल्प हाती घेण्याचे आवाहन केले. त्यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी निवृत्त अध्यक्ष रोटेरियन प्राजक्ता जेरे यांनी मागील वर्षातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि समुदाय विकास क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच क्लबचे सदस्य, देणगीदार, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन विनायक गुळवणी यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षासाठी क्लबची दिशा स्पष्ट केली. रोटरीच्या सातही फोकस एरियामध्ये प्रभावी प्रकल्प राबविणे, सदस्यांमधील स्नेह वृद्धिंगत करणे आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

या पदग्रहण सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील अनेक पदाधिकारी, ए जी दीप्ती पुजारी, विविध रोटरी क्लबचे सदस्य, मान्यवर, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थि

त होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments