Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅक्सिस पेन्शन फंडाकडून ‘अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम' लाँच वैद्यकीय आणीबाणीसाठी आरोग्याशी...

अॅक्सिस पेन्शन फंडाकडून ‘अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम’ लाँच वैद्यकीय आणीबाणीसाठी आरोग्याशी संलग्न पेन्शन सोल्यूशन

 

ही स्कीम सबस्‍क्रायबर्स आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्यविषयक खर्चासाठी आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

देशभरातील १,००० हून अधिक शहरांमधील १८,००० हून अधिक हॉस्पिटल्समध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध.

नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या अंतर्गत उद्योगातील पहिलेच सुपर टॉप-अप हेल्थकेअर सोल्यूशन समाविष्ट.

मुंबई, ऑक्टोबर १, २०२६: अॅक्सिस पेन्शन फंड मॅनेजमेंटने आज ‘अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम’च्या उपलब्धतेची घोषणा केली. हे ऐच्छिक, आरोग्याशी संलग्न पेन्शन सोल्यूशन आहे, जे नागरिकांना त्यांची दीर्घकालीन सेवानिवृत्ती बचत वाढवत असताना वैद्यकीय खर्चासाठी स्वतंत्र निधी उभारण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही योजना एनपीएस दिवस २०२६ निमित्त माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या ‘एनपीएस स्वास्थ्य’च्या औपचारिक शुभारंभाशी सुसंगत आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) सुरू केलेल्या एनपीएस स्वास्थ्यचा सेवानिवृत्ती बचत आणि आरोग्य संरक्षण एकाच छत्राखाली एकत्र आणण्याचा मनसुबा आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, अॅक्सिस पेन्शन फंडाने एनपीएस स्वास्थ्यच्या प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट टप्प्यात सहभाग नोंदवला होता, ज्यामुळे सबस्क्रायबर्सना नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या (एनपीएस) चौकटीत आरोग्य-संलग्न सेवानिवृत्ती सोल्यूशनचा प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य झाले.

अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम एनपीएस सबस्क्रायबर्सना त्यांच्या योगदानापैकी २५ टक्क्यांपर्यंत रक्कम बाजारपेठ-संलग्न वैद्यकीय आणीबाणी निधीकडे वळवण्याची सुविधा देते, ज्याचा वापर हॉस्पिटलायझेशन, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, वैद्यकीय तपासण्या आणि बाह्यरुग्ण उपचारांसाठी केला जाऊ शकतो. हे उत्पादन आरोग्यविषयक खर्चासाठी आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कव्हर न होणारे खर्च आणि को-पेमेंटचा समावेश आहे. ही योजना सबस्क्रायबर्सच्या वैद्यकीय खर्चांना पाठबळ देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी दीर्घकालीन सेवानिवृत्ती बचतीमध्येच आरोग्य संरक्षणाची सुनियोजित व्यवस्था करते.

अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम एनपीएसमध्ये नोंदणीकृत सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ही सुविधा मेडी असिस्टच्या सहयोगाने सादर करण्यात आली आहे, जी १,००० हून अधिक शहरांमधील १८,००० हून अधिक हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमध्ये सबस्क्रायबर्सना कॅशलेस वैद्यकीय उपचारांची विनासायास सुविधा उपलब्ध करून देते. ही योजना सेल्फ-फंडिंग मॉडेलवर आधारित आहे, जिथे आरोग्य संरक्षण गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या बाजारपेठ-संलग्न वाढीवर अवलंबून असते.

अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीम केवळ टॉप-अप सुविधा नसून एनपीएसच्या अंतर्गत सर्वसमावेशक आरोग्य सेवा वैशिष्ट्य म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ही योजना सर्व डे-केअर उपचारांचा खर्च कव्हर करते, ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्वी ३० दिवसांचा आणि हॉस्पिटलायझेशननंतर ६० दिवसांच्या खर्चाचा समावेश आहे, तसेच, वैद्यकीय गरजांसाठी व्यापक साहाय्य दिले जाते.

या स्कीमच्या लाँचबाबत मत व्यक्त करत अॅक्सिस पेन्शन फंडाचे एमडी आणि सीईओ सुमित शुक्ला म्हणाले, “भारतामध्ये आरोग्य आणि आर्थिक नियोजनाबाबत जागरूकतेत सातत्याने वाढ होत आहे. जागरूकता आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन वाढत आहे, तसतसे ग्राहक संरक्षणासोबत लवचिकता प्रदान करणाऱ्या सोल्यूशन्सचा शोध आहेत. एनपीएस स्वास्थ्य सबस्क्रायबर्सना त्यांची दीर्घकालीन सेवानिवृत्ती उद्दिष्टे साध्य करत असताना समर्पित आरोग्य निधी उभारण्यास सक्षम करते. ही योजना आरोग्यविषयक पूर्वतयारीची सेवानिवृत्ती नियोजनाशी सांगड घालण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अॅक्सिस पेन्शन फंड एनपीएसच्या चौकटीत आरोग्य संरक्षण आणि सेवानिवृत्ती बचत एकत्र आणण्याच्या पीएफआरडीएच्या या उपक्रमाचे स्वागत करतो. आम्हाला विश्वास आहे की, हा उपक्रम सबस्क्रायबर्सची दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि सक्षमता अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”

अॅक्सिस एनपीएस स्वास्थ्य स्कीमची ठळक वैशिष्ट्ये:

विमा पॉलिसींमध्ये अनेकदा वगळल्या जाणाऱ्या खर्चांचे संरक्षण: ही योजना ग्लोव्ह्ज, मास्क, सिरिंज यांसारख्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू, तसेच अॅडमिशन चार्जेस, डॉक्युमेंटेशन फी यांसारख्या प्रशासकीय खर्चांसाठी संरक्षण देते.

बाह्यरुग्ण उपचारांसाठी साहाय्य: सबस्क्रायबर्स डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय तपासण्या, डेंटल उपचार, औषधे आणि फार्मसी खर्चासाठी या फंडाचा वापर करू शकतात.

को-पेमेंट आणि विम्यात समाविष्ट नसलेल्या खर्चांसाठी पाठबळ: हा फंड स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कव्हर न होणाऱ्या को-पेमेंट, गैर-वैद्यकीय खर्च, औषधे आणि वैद्यकीय तपासण्यांचा खर्चासाठी मदत करू शकतो.

बाजारपेठ-संलग्न वाढीची क्षमता: निधी गुंतवणूक स्वरूपात राहतो आणि दीर्घकाळापर्यंत वाढत जातो, ज्यामुळे वैद्यकीय खर्चासाठी तातडीने वापर न झाल्यास त्यावर चांगल्या परताव्याची संधी मिळते.

सबस्क्रायबर्सना एनपीएस स्वास्थ्य परिसंस्थेच्या माध्यमातून अतिरिक्त सवलतींचाही लाभ मिळतो, ज्यामध्ये वैद्यकीय तपासण्या, औषधे, आरोग्य तपासणी पॅकेजेस, डोळे तपासणी आणि डेंटल सेवांवरील बच

तीचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments