Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहरातील पाणी टंचाई मानव निर्मित, शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष कारणीभूत

पुणे शहरातील पाणी टंचाई मानव निर्मित, शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष कारणीभूत

पुणे शहरातील पाणी टंचाई मावन निर्मित आहे कालवा समितीच्या बैठकीकडे शहरातील नेत्यांनी लक्ष दिले नाही असे स्पष्ट मत माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी व्यक्त केले आहे.

पुणे महानगरपालिका कृत्रिम पाऊस पाडण्याच्या शक्यतेचा अभ्यास करणार.

पुण्याची पाणीटंचाई ही मानवनिर्मित आहे हे यापूर्वी आम्ही स्पष्ट केले आहे.

कालवा समितीच्या बैठकीमध्ये शहरातील नेत्यांनी योग्य लक्ष दिले असते तर शेतीसाठीचे आवर्तन थांबले असते आणि माणसांना पाणी मिळाले असते.

ज्या भागामध्ये ऊस महत्त्वाचा आहे त्या भागातील आमदाराने आपल्या भागात आवर्तनाद्वारे पाणी नेले.

जिथे माणूस महत्त्वाचा आहे तेथील लोकप्रतिनिधींनी माणसांना महत्त्व दिले नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

शेती ही जगली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे माणूस जगला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बद्दल विचार सुरू झाला.

जयंत पाटील साहेब यांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला हे महाराष्ट्राने बघितले आहे त्यामुळे यासाठी पुणेकरांचे पैसे वाया घालवू नका.

योग्य वेळी योग्य गोष्टींमध्ये लक्ष दिले तर असल्या गोष्टी कराव्या लागत नाहीत अशी आमची धारण आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments