Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेस्थित दोशी आर.सी.अँड कंपनी (डीआरसी) या अकाउंटिंग आणि ॲडव्हायझरी फर्मची मनुभाई अँड...

पुणेस्थित दोशी आर.सी.अँड कंपनी (डीआरसी) या अकाउंटिंग आणि ॲडव्हायझरी फर्मची मनुभाई अँड शाह एलएलपीमध्ये धोरणात्मक विलीनीकरण झाल्याची घोषणा

 

 

पुणे १ जुलै 2026 : मनुभाई अँड शाह एलएलपी यांनी आज पुणेस्थित दोशी आर.सी.अँड कंपनी (डीआरसी) या अकाउंटिंग आणि ॲडव्हायझरी फर्मची मनुभाई अँड शाह एलएलपीमध्ये धोरणात्मक विलीनीकरण झाल्याची घोषणा केली. दोशी आर.सी.अँड कंपनी या प्रदीर्घ अनुभव असलेल्या कंपनीला चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्रात जवळपास चार दशकांचा समृद्ध वारसा आहे. या विलिनीकरणामुळे मनुभाई अँड शाह एलएलपी ही १९०० पेक्षा अधिक कर्मचारी बळ असलेली कंपनी झाली असून २००० कर्मचाऱ्यांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

 

हे विलीनीकरण मनुभाई अँड शाह एलएलपीच्या दीर्घकालीन विकास धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे लेखापरीक्षण (ऑडिट), करसल्ला (टॅक्सेशन), सल्लागार सेवा (ॲडव्हायजरी), नियामक (रेग्युलेटरी) आणि व्यवसाय सल्ला (बिझनेस कन्सल्टिंग) अशा विविध क्षेत्रांतील सेवा अधिक मजबूत होणार आहेत. अधिक गुंतागुंतीच्या आणि विकसित होणाऱ्या आर्थिक वातावरणात उद्योगांना भविष्यसज्ज व्यावसायिक सेवां द्वारे पाठबळ देण्याप्रती संस्थेची वचनबद्धता हे विलीनीकरण अधोरेखित करते.

 

 

सन 1984 मध्ये सीए राजकुमार दोशी यांनी स्थापन केलेल्या दोशी आर. सी. अँड कंपनीने व्यावसायिक उत्कृष्टता, तांत्रिक कौशल्य आणि ग्राहकांशी विश्वासार्ह संबंधांद्वारे भक्कम प्रतिष्ठा निर्माण केली आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करसल्ला, लेखापरीक्षण व ॲश्युरन्स, मूल्यांकन (व्हॅल्युएशन), वित्तीय अहवाल, स्टार्टअप सल्ला आणि अनुदान (सबसिडी) सेवा अशा विविध क्षेत्रांत संस्थेने अनेक उद्योगांना मार्गदर्शन केले आहे.

 

 

या विलीनीकरणाबाबत बोलताना मनुभाई अँड शाह एलएलपीचे सह-व्यवस्थापकीय भागीदार कौशिक पटेल म्हणाले की, ‌‘पाच दशकांच्या आमच्या यशस्वी प्रवासाला पुढे नेत असताना हे विलीनीकरण आमच्या विकासाच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. दोशी आर. सी. अँड कंपनीने गुणवत्ता, सचोटी आणि वेळेवर सेवा देण्याच्या आपल्या कटिबध्दतेमुळे ग्राहकांमध्ये विश्वास संपादन केला आहे. आमच्या दोन्ही संस्था एकत्र येणे हे उत्कृष्टतेच्या समान ध्येयाचे प्रतीक असून, यामुळे आमचे ग्राहक, कर्मचारी आणि सर्व संबंधित घटकांसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यास आम्हाला सक्षम करेल.

 

 

 

मनुभाई अँड शाह एलएलपीचे सह-व्यवस्थापकीय भागीदार क्षितीज पटेल म्हणाले की, तंत्रज्ञानामधील अभिनवता, बदलणारे नियम आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. एकात्मिक आणि भविष्याच्या वेध घेणारे सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी आमची क्षमता वाढवणे, नैपुण्य विस्तारणे आणि कुशल मनुष्यबळात गुंतवणूक करणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या विलिनीकरणामुळे ग्राहकांना व्यापक प्रमाणावर सेवा देण्यासाठी आमची क्षमता वाढेल आणि त्याचबरोबर देशांतर्गत अधिक मजबूत उपस्थिती निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाला बळ मिळेल.

 

 

 

दोशी आर. सी. अँड कंपनीचे संस्थापक सीए राजकुमार दोशी म्हणाले की,गेल्या जवळपास 40 वर्षांपासून आमची कंपनी व्यावसयिक उत्कृष्टता आणि ज्ञान व नैतिक व्यावसायिक पध्दतींच्या माध्यमातून ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध जोपासत आली आहे. मनुभाई अँड शाह एलएलपी सोबत हातमिळवणी ही आमच्या परस्परपुरक क्षमतांना एकत्र आणून आमच्या ग्राहकांना व टीम सदस्यांना नव्या संधी निर्माण करेल. आम्हाला खात्री आहे या एकत्रीकरणामुळे आमच्या भागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांचा दर्जा, व्याप्ती आणि खोली अधिक वाढेल.

 

 

अलीकडेच आपला 50 वा वर्धापन दिन साजरा केलेल्या मनुभाई अँड शाह एलएलपी ही कंपनी प्रतिभा, तंत्रज्ञान आणि विशेष क्षमतांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून आपल्या विकासाला गती देत आहे. दोशी आर.सी.अँड कंपनीसोबतचे विलिनीकरण बाजारपेठेतील आपली स्थिती अधिक बळकट करण्यावर, सेवा विस्तार करण्यावर आणि भारत व जागतिक स्तरावरील ग्राहकांना उत्कृष्ट मुल्य प्रदान करण्यावर असलेल्या कंपनीच्या सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचे निर्देशक आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रित येण्याने कंपन्यांची व्यावसायिक उत्कृष्टता, ग्राहकाभिमुखता आणि अभिनवता ही लेखा आणि सल्लागार क्षेत्रातील पुढील टप्प्यावरील विकास व नेतृत्वा

चा पाया ठरेल.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments