Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन… 

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन… 

 

 

 

 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे

 

 

 

पिंपरी, दि. १ जुलै २०२६ :- “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग अकरा वर्षे विराजमान होण्याचा मान मिळविणारे तसेच हरित क्रांतीचे जनक म्हणून सर्वदूर ओळख असणारे वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी होते.” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.

 

 

 

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त बोलत होते.

 

 

 

या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सिताराम राठोड, संदीप पवार,रघुनाथ चव्हाण, नितीन चव्हाण, गीता चव्हाण,रवी राठोड, रावसाहेब राठोड, अविनाश राठोड, नामदेव चव्हाण, प्रेम पवार,अर्जुन राठोड, शुभम खैरनार,आकाश चव्हाण, माया वाकडे, रमेश राठोड, बालाजी राठोड, अविनाश जाधव, प्रकाश डोंगरे, विजय राठोड, विनायक चव्हाण, अविनाश चव्हाण, सचिन चव्हाण, सचिन जाधव तसेच महापालिकेचे विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी उपस्थितांनी दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समाजाने जपण्याची भावना उपस्थि

तांनी व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments