Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedविविध संस्थांतर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके व कार्यकारिणी चा सत्कार संपन्न.

विविध संस्थांतर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके व कार्यकारिणी चा सत्कार संपन्न.

 

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी लोकाभिमुख कार्य करेल व सामान्य पुणेकर आणि पत्रकार यांच्यातील नातं अधिक घट्ट होईल असं मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्था, संघटना पत्रकार संघाच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करतील असं भालचंद्र कुलकर्णी व विश्वजित देशपांडे यांनी सांगितले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,आम्ही सारे ब्राह्मण चे भालचंद्र कुलकर्णी,परशुराम हिंदू सेवा संघाचे विश्वजित देशपांडे,अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक ( पुणे केंद्र ) चे विश्वनाथ भालेराव,उद्यम विकास सहकारी बँकेचे संचालक मनोज नायर, दिनेश भिलारे व वारजे कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर या सर्वांच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व जगनमित्र असलेले उमेश शेळके व सर्व कार्यकारिणी चा सत्कार करण्यात आला.

यावेळी संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांनी पुणेरी पगडी, शाल व स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन सत्कार केला तर आम्ही सारे ब्राह्मण संस्थेचे भालचंद्र कुलकर्णी यांनी सहकार महर्षी आणि ब्राह्मण रत्न ही पुस्तकं देऊन त्यांना सन्मानित केले. तर विश्वजित देशपांडे, विश्वनाथ भालेराव, मनोज नायर व दिनेश भिलारे यांनी प्रतिमा देऊन कार्यकारिणी चा सत्कार केला.

यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष योगेश बोरसे व किशोर बरकाले, खजिनदार प्रसाद पानसे, चिटणीस राहुल देशमुख, संजय सपकाळे यांच्यासह कार्यकारणी सदस्य उद्धव धुमाळे, सुशांत राऊत, ज्ञानेश्वर फड, तुषार झरेकर, गोपाळ गुरव, मिलिंद शुक्ल, सचिन वाघमारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments