Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे टीसीएस रोजगार मेळावा सोमवारी (दि.६)*  बॅक ऑफिस...

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे टीसीएस रोजगार मेळावा सोमवारी (दि.६)*  बॅक ऑफिस ऑपरेशन्स आणि डेटा प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन्स या पदांसाठी केली जाणार भरती 

 

 

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, परिसर क्रमांक २ येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यांनी दिली.

 

या रोजगार मेळाव्यात बॅक ऑफिस ऑपरेशन्स आणि डेटा प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन्स या पदांसाठी भरती केली जाणार आहे. बी.कॉम., बी.ए., बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीएएफ, बीबीआय तसेच बी.एस्सी. (सीएस/आयटी) या शाखांमधून २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये पदवी प्राप्त केलेले उमेदवार या मेळाव्यासाठी पात्र आहेत. उमेदवारांकडे कमाल सहा महिन्यांचा कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असून कोणतेही सक्रिय बॅकलॉग नसावेत. तसेच २४x७ शिफ्ट आणि नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी आवश्यक आहे.

 

ऍड. शार्दूल जाधवर म्हणाले, रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची अॅप्टिट्यूड टेस्ट व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा, शासकीय ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे तसेच टीसीएसच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. पात्र उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३५६३९९६२९ किंवा ९२७०७९८५९० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments