Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा शनिवारी समारोप* भय्याजी...

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा शनिवारी समारोप* भय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन; शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु शेखर यांची प्रमुख उपस्थिती

 

पुणे, दि. १ जुलै २०२६ :

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शिक्षा वर्गा’चा प्रकट समारोप शनिवारी (दि. ४ जुलै) सायंकाळी ठीक सहा वाजता शनिवार पेठेतील रमणबाग प्रशालेच्या मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमात संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून, तर ‘एचईएमआरएल’चे समूह संचालक व शास्त्रज्ञ डॉ. हिमांशु शेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या स्वयंसेवकांसाठी या १५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि वर्गाचे सर्वाधिकारी दत्तात्रय गर्गे यांनी दिली. शनिवारच्या मुख्य कार्यक्रमात स्वयंसेवकांद्वारे विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले जाणार असून, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

 

१९ जून रोजी सुरू झालेल्या या वर्गाचे उद्घाटन प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते झाले होते. या प्रशिक्षणात एकूण ७५ शिक्षार्थी (स्वयंसेवक) सहभागी झाले होते. वर्ग कालावधीत शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी, देशभक्ती व समाजसेवा दृढ करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी पाऊस आल्यास, हा प्रकट समारोप सोहळा रमणबाग मैदानाऐवजी ‘केसरीवाडा’ येथील लोकमान्य सभागृहात पार पडेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments