Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ*

‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ*

 

 

पुणे, दि.८: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात दाखल होणार असून वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

 

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम, .अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, पालखी नोडल अधिकारी निखिल मोरे आणि उपायुक्त माधव जगताप यांनी पालखीच्या अंतिम मुक्कामस्थळांची पाहणी करून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

 

यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामस्थळी उपलब्ध जागा पाचपट वाढवून ५ हजार चौ. फूट करण्यात आली आहे. या विस्तारित जागेत महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

 

पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला असून, लांबचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांना फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांमार्फत मोफत फिजिओथेरपी व मालिश सेवा देण्यात येणार आहे.

 

शहरातील विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी १९५ वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले आहेत. या मांडवांमधून पुणे महानगरपालिका व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आवश्यक साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 

शहरात आगमन होणाऱ्या वारकरी बांधवांच्या निवासासाठी पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळा खुल्या करण्यात आल्या असून, तेथे निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळांमध्ये मनपाच्या आरोग्य पथकांकडून चोवीस तास मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार व औषध पुरवठा केला जाणार आहे.

 

वारीच्या कालावधीत शहरातील पाणीपुरवठ्यात विशेष वाढ करण्यात आली असून, वारकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात आली आहे. मार्गावरील व मुक्कामस्थळी मोठ्या संख्येने मोबाईल शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांची स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

 

पुणे महानगरपालिका ‘सेवा वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी भाविकांना अधिकाधिक व सर्वोत्तम सेवा-सुविधा पुरविण्यास कटिबद्ध आहे. मनपाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यरत असून, पुणेकर नागरिकांनीही माऊलींच्या सेवेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments