Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सने प्रवास ५.० मध्ये सादर केले नेक्स्ट-जनरेशन पॅसेंजर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स, नवीन...

टाटा मोटर्सने प्रवास ५.० मध्ये सादर केले नेक्स्ट-जनरेशन पॅसेंजर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स, नवीन अल्ट्रा प्राइम आणि स्टारबस प्राइम श्रेणी लाँच

गांधीनगर, ९ जुलै २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज प्रवास ५.० मध्ये आपल्या व्यावसायिक पॅसेंजर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा सर्वात प्रगत पोर्टफोलिओ प्रदर्शित केला. यामध्ये प्रामुख्याने ऑल-न्‍यू टाटा अल्ट्रा प्राइम आणि टाटा स्टारबस प्राइम या बस श्रेणी लाँच करण्यात आल्या. उत्तम आरामदायी प्रवास, अधिक सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन केलेल्या या नेक्स्ट-जनरेशन बसेस संपूर्ण भारतातील प्रवासी वाहतुकीचे भविष्य घडवण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करतात. .

कंपनीने एलपीओ १६२० सीएनजी, अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२, अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही, मॅजिक ईव्ही, विंगर प्लस व अल्ट्रा प्राइम आरई कॉन्सेप्टसह अनेक उपयोगांसाठी आणि पॉवरट्रेनसाठी आवश्यक असलेल्या मसेबिलिटी सोल्‍यूशन्‍सची सर्वसमावेशक श्रेणी सादर केली. या संपूर्ण पोर्टफोलिओमधून निदर्शनास येते की, टाटा मोटर्स शहरी, इंटरसिटी व संस्थात्मक वाहतुकीसाठी सुरक्षित, शाश्वत आणि ग्राहक-केंद्रित मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते.

 

या इव्‍हेण्‍टप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडचे कमर्शियल पॅसेंजर वेईकल्सचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड श्री. आनंद एस. म्हणाले, ”प्रवास हे आमच्यासाठी फ्लीट ऑपरेटर्स व उद्योग क्षेत्रातील घटकांशी जोडले जाण्यासाठी आणि देशभरात प्रवासी वाहतुकीच्या गरजा कशा प्रकारे बदलत आहेत याबद्दल अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ राहिले आहे. या वर्षातील आमचे सादरीकरण हे कर्मचारी वाहतूक, पर्यटन, शाळा वाहतूक किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंतची वाहतूक असो विविध उपयोगांमधील ग्राहकांच्या गरजांबद्दलच्या आमच्या सखोल आकलनाला सादर करते. एलपीओ १६२० सीएनजीचा कमी खर्च, नवीन अल्ट्रा प्राइम श्रेणीची वाढलेली सुरक्षितता आणि आराम, तसेच अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही आणि मॅजिक ईव्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा झालेला विस्तार यांसह प्रत्येक सोल्‍यूशन ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आमच्या विस्तीर्ण सेवा नेटवर्क आणि सपोर्ट सिस्टमच्या बळावर ही उत्पादने ग्राहकांना वेईकचा जास्तीत जास्त वापर करण्यास, ऑपरेटिंग खर्च सुधारण्यास आणि उत्तम प्रवास अनुभव देण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय फायदेशीरपणे वाढवणे शक्य होते.”

 

प्रवास ५.० मध्ये टाटा मोटर्सने उद्योगातील सर्वात व्यापक पॅसेंजर मोबिलिटी पोर्टफोलिओ सादर केला, ज्यामध्ये शाळा, कर्मचारी, पर्यटन, इंटरसिटी, शहरांतर्गत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या वाहतुकीसाठी समकालीन व इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्‍सचा समावेश आहे. प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

 

प्रवास ५.० मधील टाटा मोटर्सच्या पॅसेंजर मोबिलिटी पोर्टफोलिओची प्रमुख वैशिष्ट्ये

 

टाटा अल्ट्रा प्राइम आणि टाटा स्टारबस प्राइम

 

शाळा, कर्मचारी व पर्यटन उपयोगांसाठी नवीन डिझाइन आणि अद्ययावत इंटिरिअरसह नेक्‍स्‍ट-जनरेशन बसेसची श्रेणी.

अधिक चांगला प्रवास अनुभव देण्यासाठी सुधारित राइड दर्जा, प्रवाशांसाठी उत्तम आराम आणि कमी एनव्हीएच पातळी.

ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा, आयटीएस आणि आरपीएएस यांसह २९ प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज.

टाटा एलपीओ १६२० सीएनजी

 

इंटरसिटी आणि शहरांतर्गत कार्यक्षम प्रवासी वाहतुकीसाठी सीएनजीवर चालणारे सोल्‍यूशन.

कमी ऑपरेटिंग खर्चासह अधिक प्रवासी वाहून नेण्याची उच्च क्षमता.

स्वच्छ आणि अधिक शाश्वत सामूहिक वाहतुकीला पाठिंबा.

·

टाटा अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२

 

पर्यटन आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रीमियम प्लॅटफॉर्म.

प्रवाशांना प्रवासाचा उत्तम आनंद आणि अधिक आरामदायी अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली वेईकल.

उच्च क्षमतेच्या इंटरसिटी वाहतूक पर्यायांचा शोध घेणाऱ्या फ्लीट ऑपरेटर्ससाठी अत्यंत उपयुक्त.

टाटा अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, शाश्वत आणि विश्वासार्ह वाहतुकीसाठी डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूल बस.

प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये, जलद चार्जिंग क्षमता आणि दीर्घकाळापर्यंत ऑपरेटिंग रेंजने सुसज्ज.

न्युरोडायव्हर्जंट (विशेष गरजा असलेल्या किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित विविधता असलेल्या) मुलांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी पर्यायी पेंट स्कीम आणि ग्राफिक्सचा पर्याय.

टाटा अल्ट्रा प्राइम आरई कॉन्सेप्ट

 

प्रामुख्याने शहरी आणि शहरांतर्गत बस वाहतुकीसाठी खास डिझाइन केलेली वेईकल, जिचे भारतात पहिल्यांदाच अनावरण करण्यात आले आहे.

प्रवाशांना अधिक आराम आणि व्यवसायाला ऑपरेटिंग विश्वासार्हता प्रदान करते.

वाहनांचा ताफा, त्यांची उत्पादकता आणि अपटाइम जास्तीत जास्त वाढवण्यासाठी डिझाइन केलेली वेईकल.

टाटा मॅजिक ईव्ही

 

लास्ट-माइल आणि फिडर वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त (झिरो-इमिशन) प्रवासी मोबिलिटी सोल्‍यूशन.

एका सिंगल चार्जवर जवळपास १२० किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

कमी ऑपरेटिंग खर्चासह विश्वासार्ह कामगिरी प्रदान करते.

टाटा विंगर प्लस

 

कर्मचारी, संस्थात्मक आणि पर्यटन उपयोगांसाठी प्रीमियम पीपल-मूव्हर (प्रवासी वाहन).

प्रवासाचा अनुभव अधिक उंचावण्यासाठी एैसपैस जागा असलेले इंटिरिअर आणि उत्तम आरामदायी व्यवस्था.

वैविध्‍यपूर्ण वैशिष्ट्यांसह उच्च ऑपरेटिंग कार्यक्षमता.

प्रबळ ग्राहक समर्थन परिसंस्‍थेचे पाठबळ

 

टाटा मोटर्सच्या प्रवासी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सना देशभरातील ४,६०० पेक्षा जास्त विक्री व सेवा टचपॉइण्‍ट्सच्‍या विस्तीर्ण नेटवर्कचे पाठबळ लाभले आहे. ग्राहकांना कंपनीच्या संपूर्ण सेवा २.० या एकात्मिक सेवा परिसंस्‍थेचा फायदा मिळतो, ज्यामध्ये २४x७ मदत, वार्षिक देखभाल पर्याय आणि सुट्या भागांची (स्पेअर पार्ट्स) खात्रीशीर उपलब्धता समाविष्ट आहे. तसेच, टाटा मोटर्स फ्लीट मॅनेजमेंट सोल्यूशन वाहनांच्या ताफ्यावर अधिक चांगली देखरेख ठेवणे, वाहनांची रस्त्यावरील उपलब्धता वाढवणे आणि ऑपरेटिंग कार्यक्षमता सुधारणे या गोष्टी सुलभ करते. टाटा जेन्युइन पार्ट्सच्या खात्रीशीर उपलब्धतेसह ही परिसंस्‍था ग्राहकांना वाहनांची कामगिरी सर्वोत्तम राखण्यास, कामाचा वेळ वाढवण्यास आणि वाहनांचे एकूण आयुष्यमान सुधारण्यास मदत करते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments