Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखंड १२ तास कीर्तनमालेत लालमहालात वारकरी तल्लीन*  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी...

अखंड १२ तास कीर्तनमालेत लालमहालात वारकरी तल्लीन*  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व सहयोगी संस्थांतर्फे सलग ८ नारदीय कीर्तनांचे आयोजन

 

 

पुणे : देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… यांसारख्या ओव्यांचे अर्थ कीर्तनाद्वारे सांगण्यासोबतच ज्ञानोबा माऊली, तुकाराम च्या नामघोषाने शेकडो वारक-यांच्या उपस्थितीत ऐतिहासीक लालमहालाचा परिसर दुमदुमून गेला. ऊन पावसाची तमा न बाळगता विठुरायाच्या भेटीसाठी कित्येक मैल चालत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी पुण्यात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील लालमहाल येथे सलग ८ नारदीय कीर्तनांच्या कीर्तनमालेत समरसता आणि संतपरंपरेचे दर्शन घेण्याकरिता वारकरी भक्तांनी उर्त्स्फूतपणे गर्दी केली.

 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, संस्कार भारती पश्चिम प्रांत व पुणे पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे वै.ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी यांच्या स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनमालेचे उद््घाटन लालमहालाचे सुरक्षारक्षक सोमनाथ भोंडे, अश्विनी ससाणे तसेच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी सुनील भंडगे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी व गाथेचे पूजन करुन झाले. यावेळी आयोजक प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड आदी उपस्थित होते.

 

कीर्तनमालेत अनुक्रमे कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस बडवे, विकास दिग्रसकर, प्रा. संगीता मावळे, महेश काणे, वासुदेव बुरसे, डॉ.चारुदत्त आफळे, शेखर व्यास, सुहास देशपांडे यांनी कीर्तन केले. संतपरंपरा, वारी तसेच भक्तीचे महत्व आणि महात्म्य कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. उपेंद्र शितुत, केदार टिळेकर (तबला), पल्लवी पिळणकर, होनराज मावळे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

 

हेमंतराजे मावळे म्हणाले, वारकरी सांप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचावत पंढरीला जाणा-या भक्तांसाठी ही अनोखी पर्वणी होती. प्रबोधिनीतर्फे वेगळ्या प्रकारे पुण्यात वारक-यांचे स्वागत करीत त्यांना नारदीय कीर्तनाचा आनंद देण्याचा प्रयत्न कीर्तनमालेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. हजारो वारकरी, दिंडीप्रमुख या कीर्तनमालेचा आनंद घेण्याकरीता लालमहालात येतात. मुक्कामाच्या दिवशी देखील वारकरींच्या स्वागतासाठी पुणेकरांची जयत्त तयारी सुरू असते. त्यामध्ये हा आगळावेगळा उपक्रम प्रबोधिनीतर्फे राबविला जातो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments