Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी* श्रीमंत दगडूशेठ...

दगडूशेठ’ तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; तब्बल ११ हजार ५०० चष्मे वाटप

 

 

पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वारक-यांसाठी आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरात २७ हजार ५६४ हून अधिक वारक-यांची तपासणी करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात तब्बल २५ हजार वारक-यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला.

 

आरोग्य शिबीर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ सूर्यवंशी, रुणाल केसरकर, प्रदीप ढवळे, मनोज वाळुंजकर, सुनील जाधव, विजय कोंढाळकर, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात वारक-यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, ११ हजार ५०० भाविकांना चष्मेवाटप यांसह वारक-यांना प्रवासा दरम्यान येणा-या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर विनामूल्य औषधे देखील देण्यात आली. अंगदुखी, पाठदुखी साठी अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, प्रथमोपचार देखील करण्यात आले. तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करुन देण्यात येणार आहे. शिबीरात डॉक्टर व स्वयंसेवक मिळून २७५ जणांनी सहभाग घेतला.

 

शिबीरात सत्यसाई सेवा आॅर्गनायझेशन, तेजोमयी आय केअर, रेणुका नेत्रालय, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ, सद्गुरु शंकर महाराज मठ अन्नछत्र समिती, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, देशपाडे आय केअर कोथरुड आदी संस्थांनी सहभाग घेतला. यापुढेही ट्रस्टतर्फे विविध मोफत आरोग्य शिबीरे घेण्यात येणार असून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच पुण्यामध्ये पालख्यांचे आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments