Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले...

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन* *वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव; मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे*

 

 

पुणे, दि. १० : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले.

 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त संजय दराडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष हिरालाल मालू, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

श्री. फडणवीस म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे शहरातील पालखीच्या ठिकाणी असणाऱ्या अडीअडचणी पुणे महानगरपलिकेने योग्य पद्धतीने दूर केल्या आणि सुविधांचा विस्तार केला. पुढच्या वर्षी यामध्ये आणखीन विस्तार करण्यात येईल.

 

वारकऱ्यांनी वारीचा आनंद घेत सुखरूप पंढरपूर येथे पोहचावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही वारी अतिशय सुखरुपपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली.

 

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहर दुमदुमले आहे. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पुणे शहरात दाखल झाले आहेत, उद्या सकाळी या पालखीच सोहळ्याचे लोणी काळभोरकडे प्रस्थान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments