Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedके. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीजकडून ९२ गुणवंत विद्यार्थ्यांना ४२६...

के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीजकडून ९२ गुणवंत विद्यार्थ्यांना ४२६ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान

मुंबई, २१ जुलै २०२६: के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने (केसीएमईटी) आपल्या प्रतिष्ठित के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अंतर्गत ९२ अत्यंत गुणवंत विद्यार्थ्यांना ४२६ लाख रुपयांच्या व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती प्रदान केल्या आहेत. भारताच्या पुढील पिढीतील नेते, नवोन्मेषक आणि परिवर्तक घडवण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा ट्रस्टने याद्वारे पुनरुच्चार केला आहे.
के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ही १९५६ मध्ये ट्रस्टद्वारे सुरू करण्यात आलेली पहिली शिष्यवृत्ती होती आणि तेव्हापासून भारतातील पदव्युत्तर अभ्यासासाठी सर्वात प्रतिष्ठित शिष्यवृत्ती बनली आहे. या शिष्यवृत्तीची रचना एका अशा दृष्टीकोनातून करण्यात आली होती की, भारतातील गुणवंत विद्यार्थ्‍यांना परदेशात अशा विषयांचे ज्ञान संपादन करता येईल जे त्या काळात भारतात उपलब्ध नव्हते आणि परत आल्यावर ते देशाच्या प्रगतीत योगदान देतील. गेल्या काही वर्षांत, या शिष्यवृत्तीचा विस्तार अधिक व्यापक विषयांमधील शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी झाला आहे.
आपल्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधत, ट्रस्टने भारतातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या शिष्यवृत्तीचा विस्तार करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा विस्तार भारतातील उच्च शिक्षण परिसंस्थेच्या ताकदीवरील ट्रस्टचा विश्वास आणि असाधारण गुणवत्तेला, त्यांनी अभ्यासासाठी कोणत्याही ठिकाणाची निवड केली तरी, पाठबळ देण्याची त्यांची कटिबद्धता प्रतिबिंबित करतो.
या वर्षी या शिष्यवृत्तीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये देशभरातून १७४४ हून अधिक अर्ज प्राप्त झाले. कडक बहु-स्तरीय निवड प्रक्रियेनंतर, मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी ९९ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.
या मुलाखती ७ आणि ८ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे एका ख्यातनाम निवड समितीद्वारे आयोजित करण्यात आल्या होत्या. या समितीत पुढील सदस्यांचा समावेश होता:
आनंद महिंद्रा, अध्यक्ष, केसीएमईटी; भारत दोशी, विश्वस्त, केसीएमईटी; उल्हास यार्गोप, विश्वस्त, केसीएमईटी; लीना लब्रू, विश्वस्त, केसीएमईटी; डॉ. इंदू शाहानी, अध्यक्षा आणि कुलपती, अ‍ॅटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, रंजन पंत, नॉन-एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-इंडिपेंडंट डायरेक्टर, महिंद्रा ग्रुप; रुचा नानावटी, चीफ ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज – एफईबी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड; रोहित ठाकूर, ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड; फरिदा बलसारा, सिनियर व्हीपी, सीएसआर, महिंद्रा ग्रुप.
या वर्षीच्या उमेदवारांच्या गुणवत्तेने आणि क्षमतेने निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांच्या असाधारण गुणवत्तेची दखल घेत, ट्रस्टने मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) जाहीर केली. शैक्षणिक गुण आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे १ ते १२ लाख रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिपची रक्कम निश्चित करण्यात आली.
मुलाखतींच्या पहिल्या दिवसाचा समारोप एका नेटवर्किंग उपक्रमाने झाला, ज्याने निवड समितीचे सदस्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांना एका अनौपचारिक वातावरणात एकत्र आणले. या मेळाव्याने विविध विद्याशाखांमधील संवादाला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यास, अनुभव शेअर करण्यास आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास मदत झाली.
या शिष्यवृत्तीविषयी मत व्यक्त करत के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले:
“दरवर्षी के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटल्याने भारताच्या भविष्याबद्दलचा माझा आशावाद पुनरुज्जीवित होतो. हे वर्ष विशेष अर्थपूर्ण आहे, कारण आपण केवळ आघाडीच्या जागतिक संस्थांमध्येच नव्हे तर भारतातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहोत. गुणवत्ता जिथे जिथे फुलते तिथे तिथे तिची दखल घेणे हे ताजेतवाने करणारे आणि आवश्यक दोन्ही आहे. ही शिष्यवृत्ती आता भारतातील प्रतिभावान तरुणांच्या नव्या पिढीच्या आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करत आहे, याचा मला आनंद आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments