Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedथेऊर फाटा मार्गावरील वाहतुकीत बदल*

थेऊर फाटा मार्गावरील वाहतुकीत बदल*

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा): थेऊर फाटा रेल्वे उड्डान पूल दुरुस्ती कामानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार थेऊर फाटा येथून थेऊर व केसनंदकडे जाणारी सर्व प्रकारची जड-अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश निर्गमीत केला आहे.

थेऊर फाटा येथून थेऊर व केसनंदकडे जाणारी सर्व प्रकारची जड व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सदची वाहतूक केडगाव चौफुला-न्हावरे मार्गे तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर येथुन थेऊर व केसनंदकडे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments