Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे असिस्टेक फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘समर्थ उन्नती’ स्टार्टअप उपक्रम...

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे असिस्टेक फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘समर्थ उन्नती’ स्टार्टअप उपक्रम सुरु

गुरुग्राम, २३ जुलै २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ची सीएसआर शाखा असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनने (एचएमआयएफ), असिस्टेक फाऊंडेशनच्या (एटीएफ) सहकार्याने आज ‘समर्थ बाय ह्युंदाई’ या उपक्रमांतर्गत ‘समर्थ उन्नती’ या असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी स्टार्टअप स्केल-अप उपक्रमाची घोषणा केली. भारतात असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीजचा वापर आणि स्वीकार वाढविण्यासोबतच नवकल्पनांना चालना देणे, तसेच उच्च क्षमता असलेल्या स्टार्ट-अप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा विस्तार करण्यास आणि बाजारपेठेतील पोहोच वाढविण्यास सक्षम करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभता, स्वावलंबन आणि समाजातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये असलेली क्षमता लक्षात घेऊन ‘समर्थ उन्नती’ हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी सोल्युशन्स विकसित करणाऱ्या आणि उच्च क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना शोधणे व त्यांना पाठिंबा देणे यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments