Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीर* कै. वैद्य...

आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार जाहीर* कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजन

पुणे : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीचे आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक वैद्य लक्ष्मण लावगनकर यांनी दिली.

रविवार, दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात कार्यक्रम होणार आहे. आयुर्वेद वाचस्पती ज्येष्ठ नामांकित वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून म्हणून उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या निमित्ताने ‘आयुर्वेदीय निदानाचे महत्व’ या विषयावर ते बोलणार आहेत.

आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य झिजवणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांनी वैद्यपरंपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तमोत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीने युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष आहे. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments