Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वर्गीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त अर्बन महिला सेल च्यावतीने...

स्वर्गीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्त अर्बन महिला सेल च्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चिखली पोलीस ठाणेतील अधिकारी आणि वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर यांचा सन्मान..*

(पिंपरी. 22 )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेलच्यावतीने स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज चिखली पोलीस ठाण्यात अभिवादन करण्यात आले. तसेच चिखली पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी जाधव सर, यांचा तसेच महिला सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य करणऱ्या पोलीस अधिकारी दीपमाला लोहकरे मॅडम यांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दादांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आरोग्य विषयक जनजागृती आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या नेहरूनगर येथील वायटल हॉस्पिटल संस्थापक राहुल तीलवानी यांच्या सहकार्याने डॉ रामश्याम अगरवाल,डॉ प्रविण भोसले, डॉ शुभम पवार,डॉ स्नेहल रोमन गटकळ यांचा यावेळी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.
यावेळी अर्बन सेल महिला शहराध्यक्षा सौ मनीषाताई गटकळ राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष शकरूला पठाणभाई सय्यद भाई तसेच पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजयाताई काटे भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषाताई जढर, निरीक्षक मिराताई कुदळे,निरीक्षक लताताई ओव्हाळ, समन्वयक शोभाताई आवटी यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अजितदादा पवार यांच्या समाजाभिमुख नेतृत्वाला मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments