Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंवाद पुणे’चे सुनील महाजन यांचा एकसष्ठीनिमित्त दि. ३० रोजी भव्य नागरी सत्कार

संवाद पुणे’चे सुनील महाजन यांचा एकसष्ठीनिमित्त दि. ३० रोजी भव्य नागरी सत्कार

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गायन, वादन, नृत्यसंगीत, नाटके, बालमहोत्सव आदींचे गेली ४० वर्षे आयोजन करणाऱ्या ‘संवाद पुणे’चे संस्थापक अध्यक्ष सुनील महाजन यांचा वयाच्या एकसष्ठीनिमित्त भव्य नागरी सत्कार शनिवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल.
याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, डॉ. मोहन आगाशे, मा. कृष्णकुमार गोयल, मा. उल्हासदादा पवार, मा. मोहन जोशी, मा. शेखर गायकवाड, मा. ल. म. कडू, श्रीमती लीला गांधी, पं. सुरेश तळवलकर, मा. रामदास फुटाणे, मा. राजेश पांडे, डॉ. अभिजित वैद्य, मा. आनंद माडगूळकर, डॉ. संजय चोरडिया, मा. वसंतराव मस्के, श्रीमती आशा काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी चित्रफीत दाखविली जाणार असून, गौरव विशेषांकाचे प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ‘रंग–तरंग’ गीत, संगीत, नृत्य सांस्कृतिक सोहळा संपन्न होईल. यामध्ये नृत्य सहभाग अभिनेत्री शर्वरी जमेनीस, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांचा असून, गायक जितेंद्र भुरुक, त्यागराज खाडिलकर, योगिता गोडबोले, सुजित सोमण, अश्विनी कुरपे हे आहेत. मिलिंद कुलकर्णी, स्नेहल दामले, योगेश सुपेकर हे निवेदक असतील, अशी माहिती सचिन इटकर, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments