Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedवी मूव्हीज अँड टीव्हीने आणला २०० रुपयांचा व्हॅल्यू पॅक, यामध्ये मिळणार २०...

वी मूव्हीज अँड टीव्हीने आणला २०० रुपयांचा व्हॅल्यू पॅक, यामध्ये मिळणार २० ओटीटी प्लॅटफॉर्म्स, २०० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ३० जीबी डेटा

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ चा मनोरंजन प्लॅटफॉर्म ‘वी मूव्हीज अँड टीव्ही’ ने आज एक नवीन ‘व्हॅल्यू एंटरटेनमेंट पॅक’ लाँच केला आहे. या एकाच रिचार्जमध्ये ग्राहकांना २० टॉप ओटीटी प्लॅटफॉर्म्स, २०० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, ३० जीबी डेटा आणि सोबत ‘अमर्याद 5जी डेटा’ असा भरगच्च खजिना मिळणार आहे.

 

 

 

नवीन ‘वी मूव्हीज अँड टीव्ही’ प्रीपेड पॅकची किंमत फक्त २०० रुपये असून वैधता २८ दिवसांची आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडत्या मनोरंजनाचा आनंद अधिक सोप्या पद्धतीने घेता यावा यादृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. हा एक प्रीपेड पॅक घेतल्यावर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज उरणार नाही. बहुतांश केबल टीव्ही किंवा डीटीएच सेवांच्या एका महिन्याच्या खर्चापेक्षाही कमी किमतीत अखंडित मनोरंजनाचा आनंद घेता येईल.

 

 

 

आजकाल ग्राहक एकाच वेळी अनेक ओटीटी सबस्क्रिप्शन्स वापरतात. पण या नवीन पॅकमध्ये मात्र एकच रिचार्ज करून तुम्हाला मिळेल मनोरंजनाचा मोठा खजिना! आता वेगवेगळ्या सेवांसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन घेण्याची आणि वेगवेगळे पेमेंट करण्याची कटकट विसरा. या पॅकमध्ये जिओहॉटस्टार, सोनीलिव, झी५, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, मनोरमा मॅक्स, फॅनकोड, प्लेफ्लिक्स, क्लिक, अतरंगी, चौपाल, ओटीटीप्ले लाईव, पॉकेट फिल्म्स, यपटीव्ही, अड्डाटाइम्स, कंचा लंका, टाइम्सप्ले, नेक्स्टजीटीव्ही आणि अशा अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा एक्सेस अगदी सहज मिळतो.

 

 

 

‘वी मूव्हीज अँड टीव्ही’ तुम्हाला मिळते मनोरंजन, तब्बल १६ वेगवेगळ्या भाषांमध्ये! एकाच सबस्क्रिप्शनमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मनोरंजनाचा उत्तम मिलाप असल्यामुळे भारतभरातील प्रेक्षकांच्या विविध आवडीनिवडी यामध्ये पूर्ण होतील.

 

 

 

मनोरंजनाचा हा धमाकेदार पॅक अजून जास्त खास बनवण्यासाठी, यामध्ये ३० जीबी हाय-स्पीड डेटासह ‘अमर्याद ५जी डेटा’ देखील मिळतो. तुम्ही प्रवास करत असाल तरी देखील, कुठेही, कधीही, विनाखंड स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकाल.

 

 

 

प्रीमियम ओटीटी कॉन्टेन्ट, २०० पेक्षा जास्त लाईव टीव्ही चॅनेल्स आणि डेटाचे फायदे एकाच रिचार्जमध्ये उपलब्ध करून देत, ‘वी मूव्हीज अँड टीव्ही’ने ग्राहकांसाठी डिजिटल मनोरंजन अधिक सुलभ, सोयीस्कर आणि परवडणारे बनवले आहे. हा रिचार्ज प्लॅन चार वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर विनाखंड मनोरंजनाचा आनंद देतो, ज्यामध्ये ग्राहक ‘सोनीलिव’ वगळता इतर सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकाच वेळी दोन स्क्रीन्सवर त्यांच्या आवडत्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात.

 

 

 

या नवीन ₹२०० च्या ‘वी मूव्हीज अँड टीव्ही’ पॅकचे रिचार्ज ‘वी ऍप’ मध्ये किंवा इतर कोणत्याही रिचार्ज प्लॅटफॉर्मवरून सहज करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments