Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized'मंचर येथे आयोजित महाराजस्व अभियाना' अंतर्गत समाधान शिबीरात ८१६ लाभार्थ्यांना थेट लाभ*

‘मंचर येथे आयोजित महाराजस्व अभियाना’ अंतर्गत समाधान शिबीरात ८१६ लाभार्थ्यांना थेट लाभ*

 

 

पुणे, दि. 28: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, (२७ जुलै) रोजी शिवगिरी मंगल कार्यालय, मचर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत विधानसभा मतदारसघस्तरीय भव्य ‘समाधान शिबीर पार पडले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी आबेगाव व शिरूरचे उपविभागीय अधिकारी, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी , तालुका कृषी अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी याची प्रमुख उपस्थिती होती.

 

श्री. पाटील म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने आणि एकाच छताखाली पोहोचावा, हा या समाधान शिबीराचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनाने तत्परतेने सोडवून त्याना शासकीय सेवाचा थेट लाभ द्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

 

मागील कार्यक्रमामध्ये आंबेगाव तालुक्यातील ९,७१८ आणि शिरूर तालुक्यातील ५,१५० नागरिकाना विविध शासकीय योजनाचा लाभ मिळाला होता. याच साखळीत आज पार पडलेल्या शिबीरामध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण ८१६ लाभार्थ्यांना थेट सेवा व दाखल्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आबेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल, बचत गट, शिक्षण, रोजगार हमी व पशूसंवर्धन विभागातील २७१ लाभार्थी, तर शिरूर पंचायत समितीमार्फत ७५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याशिवाय आरोग्य विभागामार्फत १८२, संजय गांधी निराधार योजना, महसूल व निवडणूक शाखेतून १२५, कृषी विभागाकडून ५६, महा ई-सेवा केंद्राद्वारे ३९, महिला व बालविकास विभागातर्गत २८, प्रकल्प अधिकारी घोडेगाव (आदिवासी विकास) १५, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ८, भूमी अभिलेख ३ आणि इतर ११ अशा विविध सेवांचा समावेश असून सर्व स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकाच्या समस्यांचे एकाच छताखाली निवारण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments