Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंबई उपनगर जिल्ह्यात वांद्रे येथे  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर...

मुंबई उपनगर जिल्ह्यात वांद्रे येथे  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान लाभाथ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण

 

मुंबई, दि. २८ : मुंबई उपनगर जिल्ह्यात वांद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर अॅड. आशिष शेलार जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वरुण सरदेसाई, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील नगरसेवक उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते लाभार्थांना विविध प्रकारचे दाखले प्रतिनिधीक स्वरुपात वितरित करण्यात आले. नागरिकांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शिबिरामध्ये अधिक सहभाग नोंदवून शासकीय सेंवाचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रास्ताविकामध्ये या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विषयक सेवा जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे असल्याचे सांगितले.

 

शिबिरामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत विविध दाखले, ७/१२ उतारे, आधार नोंदणी, रेशनिंगसंबंधित प्रलंबित कामे तसेच विविध योजनांचे अर्ज स्वीकारून अनेक प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. तसेच संगांयो श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना व आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले. महसूल विभाग, नगर भूमापन कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग, शिधावाटप कार्यालय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), महिला बचत गट, समाज कल्याण विभाग, इत्यादी कार्यालयांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले.

 

या अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी गावपातळीवर तसेच कार्यालयीन स्तरावर विशेष प्रयत्न करत आहेत. जिल्हामध्ये आज पर्यंत एकूण ७ ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरांतर्गत एकूण २५०० पेक्षा अधिक प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आलेले आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये २२ जुलै, २०२६ ते २ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात अभियान राबविले

जात आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments