Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली लातूर अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थनार्थ मोर्चात घेतला...

लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली लातूर अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थनार्थ मोर्चात घेतला हजारो मातंग बांधवांनी सहभाग!

 

 

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) २८ जुलै २०२६:- मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंखेच्या नुसार अ ब क ड उपवर्गीकर समर्थनार्थ लातुर जिल्हा परिषद कार्यालया समोर (दि.२७) मातंग समाज व इतर तस्सम पोटजातीचा महामोर्चा पन्नास हजार पेक्षा अधिक बहुजन समाज सामाविष्ट होऊन यशस्वी पार पाडण्यात आला‌. या मोर्चाला पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातून लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली हजारो मातंग बांधवांनी सहभाग घेतला.

 

या महामोर्चाची सुर्वात शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख लोकसेवक युवराज दाखले व अखिल भारतीय मातंग संघ जेष्ठ नेते नामदेव रिट्टे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.

 

दरम्यान या प्रसंगी सामाजिक सलोखा राखण्यासाठी अपयशी ठरलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र राज्य मंत्री संजय क्षिरसाट यांचा राजीनामा घेण्याची लोकसेवक युवराज दाखले यांनी मागणी केली .

 

यावेळी यशस्वी मोर्चात शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, अखिल भारतीय मातंग संघ जेष्ठ नेते नामदेव रिट्टे, नानासाहेब रोखडे, चंद्रकांत शिंदे, नामदेव खवळे,शहीद संजय ताकतोडे यांचे बंधू हनुमंत ताकतोडे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघाचे बार्शी येथील अध्यक्ष धनंजय ढावरे, संतोष कांबळे, बाबासाहेब रसाळ, आदी शेकडो पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहरातून उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments