Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुनिट मुख्यालय कोट्यातील अग्निवीर भरती मेळावा २९ ऑगस्ट रोजी सिकंदराबाद येथे

युनिट मुख्यालय कोट्यातील अग्निवीर भरती मेळावा २९ ऑगस्ट रोजी सिकंदराबाद येथे

 

 

पुणे, दि. २८ (जिमाका) : युनिट मुख्यालय कोट्याअंतर्गत ‘अग्निवीर टेक्निकल’ व ‘अग्निवीर ट्रेड्समन’ (१० वी उत्तीर्ण – शेफ श्रेणी) पदांसाठी तसेच पोहणे, डायव्हिंग आणि व्हॉलीबॉल या खेळांतील उत्कृष्ट खेळाडूंसाठी (ओपन कॅटेगरी) भरती मेळाव्याचे आयोजन दि. २९ ऑगस्ट २०२६ पासून १ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग (EME) सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा) येथे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.

 

हा भरती मेळावा युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या विधवा, इतर विधवा, माजी सैनिक व सेवारत सैनिक यांचे पुत्र तसेच सेवारत सैनिक किंवा माजी सैनिक यांचे सख्खे भाऊ यांच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

पात्र उमेदवारांनी दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता मिल्खा सिंग स्टेडियम, १ ट्रेनिंग बटालियन, १ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेंटर, सिकंदराबाद येथे भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.

 

भरतीसाठी आवश्यक सर्व प्रमाणपत्रे व शपथपत्रे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे. प्रादेशिक भाषेतील दस्तऐवज सादर करताना त्यांचे विधिवत प्रमाणित व नोटरीकृत इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील भाषांतरित सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्रे व प्रतिज्ञापत्रांचे नमुने (फॉर्मेट) जवळील आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (ARO), झोनल रिक्रूटिंग ऑफिस (ZRO), रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्र, लष्करी मुख्यालय, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग (EME) युनिट्स किंवा राज्य सैनिक कल्याण कार्यालयातून उपलब्ध होतील. तसेच संबंधित पत्राचा संदर्भ देऊन हे नमुने थेट १ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेंटरकडूनही प्राप्त करता येतील.

 

अधिक माहितीसाठी awwaleagle@gmail.com या ई-मेलवर अथवा ०४०२७-८६३०१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्याचे सर्व अधिकार १ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेंटरचे कमांडंट यांच्याकडे राखीव असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी नमूद केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments