Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedइन्व्हेस्को म्युच्युअल फंडाकडून इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ आणि इन्व्हेस्को इंडिया निफ्टी...

इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाकडून इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ आणि इन्व्हेस्को इंडिया निफ्टी बँक ईटीएफ लाँच एनएफओ खुला होण्याची तारीख: २८ जुलै २०२६; बंद होण्याची तारीख: ११ ऑगस्ट २०२६

मुंबई, जुलै २८, २०२६: इन्व्हेस्को म्युच्युअल फंडने आज इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ (बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचे अनुकरण/ट्रॅकिंग करणारी एक ओपन एंडेड योजना) आणि इन्व्हेस्को इंडिया निफ्टी बँक ईटीएफ (निफ्टी बँक इंडेक्सचे अनुकरण/ट्रॅकिंग करणारी एक ओपन एंडेड योजना) लाँच करण्याची घोषणा केली. या योजना भारतातील मुख्य इक्विटी आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांना पॅसिव्ह गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.

 

इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन राहून बीएसई सेन्सेक्स इंडेक्सच्या रचनेचे अनुकरण करत इक्विटी आणि इक्विटी संबंधित रोख्यांमध्ये पॅसिव्ह गुंतवणूक करेल. भारतातील सर्वाधिक ट्रॅक केल्या जाणाऱ्या इक्विटी बेंचमार्क्सपैकी एक असलेला बीएसई सेन्सेक्स, अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमधील देशातील ३० सर्वात मोठ्या, नफा कमावणाऱ्या आणि उद्योग-अग्रणी कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. प्रदीर्घ ट्रॅक रेकॉर्डसह, हा निर्देशांक भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीशी जोडलेला राहिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी एक सोपा, पारदर्शक आणि किफायतशीर मार्ग मिळतो.

 

ही योजना शक्य तितक्या कमी ट्रॅक एररसह बेंचमार्क निर्देशांकाचा पाठपुरावा करण्याच्या (ट्रॅक करण्याच्या) धडपडीसह बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाचा घटक असलेल्या कंपन्यांमध्ये निर्देशांकातील वजनानुसारच गुंतवणूक करेल.

 

इन्व्हेस्को इंडिया निफ्टी बँक ईटीएफ ट्रॅकिंग त्रुटींच्या अधीन राहून निफ्टी बँक इंडेक्सच्या रचनेचे अनुकरण करत इक्विटी आणि इक्विटी संबंधित रोख्यांमध्ये पॅसिव्ह गुंतवणूक करेल. निफ्टी बँक इंडेक्समध्ये खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील भारतातील अग्रगण्य बँकिंग संस्थांचा समावेश आहे; हा विभाग आर्थिक वाढीला गती देण्यात मध्यवर्ती भूमिका बजावतो.

 

ही योजना निफ्टी बँक इंडेक्सचे घटक असलेल्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित रोख्यांमध्ये निर्देशांकातील वजनानुसारच गुंतवणूक करून, कमी ट्रॅकिंग एरर राखण्यावर लक्ष केंद्रित करत पॅसिव्ह गुंतवणूक धोरण स्वीकारेल. हा दृष्टिकोन प्रस्थापित बँकिंग फ्रँचायझींमध्ये वैविध्य प्रदान करताना गुंतवणूकदारांना बँकिंग क्षेत्रातील केंद्रित एक्स्पोजर उपलब्ध करून देतो.

 

प्रबळ देशांतर्गत वापर, लोकसंख्याशास्त्रीय फायदे, धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारणाऱ्या वित्तीय बाजारांच्या पाठबळावर भारताचे अनुकूल मॅक्रो-इकॉनॉमिक वातावरण दीर्घकालीन संपत्ती निर्मितीला बळ देत आहे. इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ आणि इन्व्हेस्को इंडिया निफ्टी बँक ईटीएफ हे दोन्ही फंड एकत्रितपणे गुंतवणूकदारांना पॅसिव्ह गुंतवणुकीद्वारे भारताच्या दीर्घकालीन वाढीच्या संधींमध्ये पारदर्शक आणि किफायतशीर प्रवेश प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या दोन्ही फंडांचे व्यवस्थापन अभिषेक बाहिनीपती करणार आहेत.

 

दोन्ही योजनांसाठी एनएफओ दरम्यान किमान एकरकमी (lumpsum) गुंतवणूक रक्कम ५,००० रूपये आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments