Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने रस्ते दुरुस्तीच्या निविदांमध्ये दर्जेदार कामे सुनिश्चित...

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने रस्ते दुरुस्तीच्या निविदांमध्ये दर्जेदार कामे सुनिश्चित करण्याबाबत तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी

पुणे -पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने रस्ते दुरुस्तीच्या निविदांमध्ये दर्जेदार कामे सुनिश्चित करण्याबाबत तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे की

पुणे शहरामध्ये पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा २०२७ पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांचा विकास करणे व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात आपण जे इस्टिमेट केले आहे ते चुकीचे असून त्यासाठी जे कंत्राटदार आपण निवडणार आहात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या EIL संस्थेमार्फत त्यांच्या कामाची तपासणी करून मगच बिले अदा करावीत मागील ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या वेळेला सुद्धा EIL लावण्याची मागणी आम्ही केली होती परंतु त्याचा विचार झाला नाही
या अनुषंगाने खालील बाबी आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
१. मागील वर्षी सायकल स्पर्धेच्या मार्गावरील अनेक रस्त्यांवर संबंधित ठेकेदारांनी केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे आत्ताच झालेल्या पावसानंतर दिसून आले आहे. परिणामी अल्पावधीतच अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी संपूर्ण रस्त्याचा थरच खराब झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे
२. शहरातील चेंबर समपातळीत करण्यासाठी नवीन SOP पद्धतीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. तथापि, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी चेंबरच्या बाजूचे काँक्रीट निघून गेले असून चेंबरभोवती मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून वाहनचालक व सायकलपटू यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. इतका मोठा सार्वजनिक निधी खर्च करूनही कामांचा दर्जा समाधानकारक राहिलेला नाही. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत, अशा ठेकेदारांना चालू वर्षाच्या निविदा प्रक्रियेतून अपात्र घोषित करावे अथवा नियमानुसार काळ्या यादीत (Blacklisting) समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी.
३. निकृष्ट कामाचे एक प्रमुख कारण म्हणजे मोठ्या स्वरूपाच्या निविदा मिळाल्यानंतर मूळ ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर कामे उपठेकेदारांकडे सोपविण्यात आली. त्यामुळे उपठेकेदारांनी काम करताना आवश्यक गुणवत्ता नियंत्रणाकडे दुर्लक्ष केले, कारण अंतिम जबाबदारी मूळ ठेकेदारावरच राहणार असल्याची त्यांना जाणीव होती. ही बाब लक्षात घेता प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये शुद्धीपत्रक (Corrigendum) काढून Joint Venture (JV) ची अट समाविष्ट करावी, जेणेकरून संबंधित भागीदारांची जबाबदारी स्पष्ट होईल, गुणवत्तेवर नियंत्रण राहील तसेच स्पर्धात्मक दरही प्राप्त होतील.
४. सायकल स्पर्धेच्या मार्गावरील सर्व कामे EIL (Engineers India Limited) यांच्या देखरेखीखाली व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेअंतर्गत करण्यात यावीत, जेणेकरून सर्व कामे निर्धारित तांत्रिक निकषांनुसार, दर्जेदार व सुरक्षित होतील.
वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागास देऊन दर्जेदार कामे होण्यासाठी तसेच दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी
हि विनंती या निवेदनाची प्रत महापौर मंजुषाताई नागपुरे यांना देण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments