Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे जिल्हा बँकेच्या LTSB ( Long Term Subordinate Bonds ) बाँडचे निर्धारित...

पुणे जिल्हा बँकेच्या LTSB ( Long Term Subordinate Bonds ) बाँडचे निर्धारित वेळेपूर्वीच विक्रमी उद्दिष्ट पूर्ण

पुणे,ता.१२ : स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने LTSB व PDI बाँडच्या विक्रीचा शुभारंभ राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री.विद्याधर अनास्कर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता.रिझर्व बँकेने दिलेल्या परवानगीनुसार तसेच पुणे जिल्ह्यातील नागरी/ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांना वैधानिक तरलतेसाठी (SLR) करावयाच्या एकूण ठेवीच्या किमान २५% एवढ्या गुंतवणुकीपैकी ५% गुंतवणूक बँकेच्या बाँड मध्ये गुंतवण्यास राज्य शासनाने दिलेल्या परवानगीनुसार बँकेने निर्धारित वेळेपूर्वीच रुपये ५०० कोटींचे LTSB बाँडच्या विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे तसेच राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या इतिहासामध्ये इतक्या अल्प कालावधीमध्ये एवढे मोठे उद्दिष्ट पूर्ण करणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव जिल्हा बँक असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले आहे.

दहा वर्षांच्या कालावधीसाठी किमान दहा हजार रुपयांची गुंतवणूक व ८.५०% या आकर्षक व्याजदराने दर तीन महिन्यांने खात्यावर जमा होणारे व्याज तसेच पुणे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांबरोबरच इतर विविध प्रकारच्या सहकारी संस्था,ठेवीदार,गुंतवणूकदार, सभासद यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास यामुळेच बँकेने हे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केलेले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार,कृषी मंत्री मा.ना.दत्तात्रयमामा भरणे,माजी सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील या मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन,बँकेचे सर्व संचालक,वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, वि.का. संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांनी घेतलेले अथक परिश्रम बँकेच्या या बाँड उद्दिष्टपूर्ती उपक्रमामध्ये मोलाचे ठरले आहे.

मार्च २०२६ अखेर बँकेच्या १७,१८९ कोटीच्या ठेवी असून एकूण उलाढाल ३०,७६७ कोटीची आहे तसेच बँकेने जिल्ह्यातील २९४ शाखांमार्फत १३,५७८ कोटींचे विविध प्रकारच्या कर्जाचे वितरण केलेले असून ४६१.३४ कोटीचा ढोबळ व ७८.७८ कोटीचा निव्वळ नफा बँकेस झाला आहे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यामध्ये सभासद, ठेवीदार कर्जदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.आणि त्यांच्या या विश्वासामुळेच बँकेने आज मोठे यश संपादन केलेले आहे व बाँडची विक्रमी विक्री करून उद्दिष्टही पूर्ण केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments