Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम...

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम सुरू

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि ऑटोमोबाईल केंद्र असलेल्या पुणे शहरात युरोपियन मोबिलिटी ब्रँडची मजबूत उपस्थिती; अभिनेत्री पूजा चोप्रा यांनी पहिल्या व्हीएलएफ मॉबस्टर 135 ची चावी स्वीकारली
• ऑस्ट्रियामध्ये इंजिनिअर केलेल्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीमध्ये डिझाइन केलेल्या व्हीएलएफ स्कूटर्स आता पुण्याच्या वाढत्या मोटरसायकल बाजारपेठेत उपलब्ध होणार.
• बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस इंडिया वर्ल्ड 2009 पूजा चोप्रा यांना लॉन्च कार्यक्रमात व्हीएलएफ मोबस्टर 135 ची चावी देण्यात आली.
पुणे, भारत | 14 ऑगस्ट 2026 — मोटोहाऊस इंडियाने पुण्यातील बाणेर येथे आपल्या अत्याधुनिक फ्लॅगशिप शोरूमचे भव्य उद्घाटन केले. हे शोरूम श्री. शैलेंद्र विश्वकर्मा यांच्या मालकीच्या VALIDUS MOTO यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आले आहे. देशभरातील वेगाने वाढणाऱ्या आपल्या विस्तार योजनेअंतर्गत मोटोहाऊस इंडियाने युरोपमधील प्रसिद्ध मोबिलिटी ब्रँड ऑस्ट्रियातील ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीतील बोलोग्ना येथील व्हीएलएफ स्कूटर्स पुणे शहरात सादर केले आहेत. महाराष्ट्रातील तसेच पश्चिम भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल बाजारपेठांपैकी एक असलेल्या पुण्यात हे ब्रँड आता ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
डीलर प्रिन्सिपल श्री. शैलेंद्र विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले मोटोहाऊस पुणे शोरूम हे कंपनीच्या देशव्यापी विस्तार योजनेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. कंपनीचे 2026 च्या अखेरपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आणखी 15 आउटलेट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच ऑटोमोबाईल क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुण्यात दुचाकीप्रेमींची मोठी संख्या आहे. तसेच डिजिटल क्रिएटर्स आणि आधुनिक जीवनशैलीला पसंती देणारे शहरी ग्राहकही येथे मोठ्या संख्येने आहेत. अशा ग्राहकांसाठी आकर्षक आणि आधुनिक मोबिलिटी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुणे ही मोटोहाऊससाठी महत्त्वाची बाजारपेठ ठरत आहे.
रोमांचक कार्यक्रम आणि लॉन्च सोहळ्यातील प्रमुख आकर्षणे
या लॉन्च कार्यक्रमाला प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडिया, ऑटोमोबाईल पत्रकार, स्थानिक कंटेंट क्रिएटर्स आणि ब्रँडशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमात मोटोहाऊस इंडियाची वाहने आणि कंपनीची भविष्यातील विस्ताराची योजना सादर करण्यात आली.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षणे पुढीलप्रमाणे:
• रिबन कापून उद्घाटन: मोटोहाऊस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तुषार शेळके, डीलर प्रिन्सिपल श्री. शैलेंद्र विश्वकर्मा आणि अभिनेत्री व मिस इंडिया वर्ल्ड 2009 पूजा चोप्रा यांच्या हस्ते शोरूमचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
• पहिल्या वाहनाची डिलिव्हरी: पुण्यातील पहिल्या व्हीएलएफ मॉबस्टर 135 स्कूटरची अधिकृत डिलिव्हरी अभिनेत्री पूजा चोप्रा यांना कार्यक्रमादरम्यान करण्यात आली.
• मीडिया आणि क्रिएटर्सचा सहभाग: पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी वाहनांची सविस्तर माहिती, तांत्रिक सत्रे तसेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष मुलाखती आयोजित करण्यात आल्या.
पुण्यात युरोपियन प्रीमियम वाहनांची खास रेंज सादर
नव्याने सुरू झालेल्या बाणेर येथील शोरूममध्ये दमदार परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या युरोपियन वाहनांची निवडक रेंज ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.
ब्रिक्स्टन मोटरसायकल्स (ऑस्ट्रिया):
• ⚡ क्रॉसफायर 500X: क्लासिक डिझाइनसोबत आधुनिक आणि आकर्षक लूक असलेली ही शहरी स्क्रॅम्बलर मोटरसायकल आहे. यात मध्यम क्षमतेचे ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे.
• ⚡ क्रॉसफायर 500XC: अॅडव्हेंचर राइडिंगसाठी तयार केलेली ही मोटरसायकल शहरातील रस्त्यांसोबतच ऑफ-रोड राइडिंगसाठीही योग्य आहे. लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन आणि मजबूत ऑफ-रोड क्षमता हे तिचे वैशिष्ट्य आहे.
• ⚡ क्रॉमवेल 1200: आधुनिक आणि क्लासिक डिझाइन असलेली ही दमदार मोटरसायकल आहे. 1200cc ट्विन-सिलिंडर इंजिनमुळे हायवेवर आरामदायी आणि सहज प्रवास करता येतो.
• ⚡ क्रॉमवेल 1200X: स्क्रॅम्बलर शैलीतील ही दमदार मोटरसायकल असून विविध प्रकारच्या रस्त्यांवर आणि वेगवेगळ्या परिस्थितीत आत्मविश्वासाने राइडिंग करण्यासाठी तिची रचना करण्यात आली आहे.
व्हीएलएफ स्कूटर्स (बोलोग्ना, इटली):
• ⚡ व्हीएलएफ मॉबस्टर 135: स्पोर्टी 4-व्हॉल्व्ह, लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन असलेली ही दमदार पेट्रोल स्कूटर आहे. शहरातील दैनंदिन प्रवासासाठी वेगवान, सहज आणि आरामदायी राइडिंग अनुभव देण्यासाठी तिची रचना करण्यात आली आहे.
• ⚡ व्हीएलएफ टेनिस1500: हलक्या वजनाची आणि आकर्षक आधुनिक इटालियन डिझाइन असलेली ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्ट आणि आधुनिक मोबिलिटीचा पर्याय म्हणून ती सादर करण्यात आली आहे.
कार्यक्रमावेळी मोटोहाऊस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. तुषार शेळके म्हणाले, “पश्चिम भारतातील आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी पुणे हे मोटोहाऊस इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे बाजारपेठ आहे. या भव्य उद्घाटनाच्या माध्यमातून आम्ही आम्ही पुण्यातील प्रीमियम बाइक्स पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी वारसा, इटालियन डिझाइन आणि ऑस्ट्रियन इंजिनिअरिंगचा सुंदर संगम घेऊन आलो आहोत. जगातील सर्वोत्तम वाहने उपलब्ध करून देणे एवढेच आमचे एकमेव उद्दिष्ट नाही, तर संपूर्ण भारतात उत्साही रायडर कम्युनिटी तयार करणे, ग्राहकांना उत्तम आणि संस्मरणीय मालकीचा अनुभव देणे आणि एक वेगळी व आकर्षक लाइफस्टाइल मोबिलिटी व्यवस्था उभारणे हेही आमचे ध्येय आहे.”
यावेळी मोटोहाऊस पुणेचे डीलर प्रिन्सिपल श्री. शैलेंद्र विश्वकर्मा म्हणाले, “ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्ससारखे जागतिक दर्जाचे युरोपियन मोबिलिटी ब्रँड पुण्यात सादर करण्यासाठी मोटोहाऊस इंडियासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. पुण्यातील दुचाकी बाजारपेठ वेगाने बदलत असून येथे प्रीमियम, आकर्षक आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या दुचाकींची मागणी वाढत आहे. बाणेर येथील आमचे फ्लॅगशिप एक्सपिरियन्स सेंटर प्रत्येक रायडरला उत्तम विक्री सेवा, आफ्टर-सेल्स सर्व्हिस आणि रायडर कम्युनिटीशी जोडणारा उत्तम अनुभव देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.”
मोटोहाऊस इंडिया विषयी
मोटोहाउस इंडिया आपल्या देशभरातील विस्तार योजनेला वेगाने पुढे नेत आहे. कंपनीचा भर प्रीमियम युरोपियन मोटरसायकल ब्रँड्स, हाय-परफॉर्मन्स पेट्रोल स्कूटर्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स आणि रायडर्ससाठी खास कम्युनिटी अनुभव उपलब्ध करून देण्यावर आहे. मोटोहाउस इंडियाचे उद्दिष्ट देशभरात मल्टी-ब्रँड एक्सपीरियंस हबचे मजबूत नेटवर्क तयार करणे आहे. या केंद्रांद्वारे ग्राहकांना नवीन आणि आधुनिक उत्पादने, उत्तम ग्राहक सेवा तसेच वाहन मालकीचा शानदार अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments