Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मौ. वडारवाडी, भांबुर्डा, शिवाजीनगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण*

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मौ. वडारवाडी, भांबुर्डा, शिवाजीनगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण*

पुणे, दि. १४: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र तर्फे मौ. वडारवाडी, भाबुर्डा, शिवाजीनगर पुणे येथील सि.स.नं. ९५२, फायनल प्लॉट नं. ३३५ मधील झोपड्यांचे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाने पूर्ण करण्यात आले.

पुणे शहरातील वडारवाडी ही एक सर्वात मोठ्या झोपडपट्टयापैकी असून त्यामधील सि.स.न. ९५२, फायनल प्लॉट न. ३३५ वडारवाडी, भांबुर्डा, शिवाजीनगर पुणे ही झोपडपट्टीचा एक भाग आहे. सदर झोपडपट्टी ही पुण्यातील सन १९६१ पासून अस्तित्वात असलेली सर्वात जुनी झोपडपट्टी असल्याने पुनर्वसन होणे गरजेचे होते. त्यानुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची टप्पेनिहाय कार्यवाही सुरू आहे. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रीयेमध्ये झोपड्यांचे सर्वेक्षण हा महत्त्वाचा टप्पा असून सर्व झोपडीधारकांचा सर्वेक्षणास सकारात्मक प्रतिसाद होता. हे सर्वेक्षण विना अडथळा पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टीतील नागरीकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पुणे शहरातील सर्वात जुन्या असलेल्या मौ. वडारवाडी, भांबुर्डी, शिवाजीनगर पुणे येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने झोपड्यांचे सर्वेक्षण हा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी कळविली आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments