Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांकडून पुणे येथे स्वागत समारंभ

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांकडून पुणे येथे स्वागत समारंभ

पुणे, दि. 15: देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शनिवारी (दि. 15 ऑगस्ट) संध्याकाळी पुणे येथील लोकभवनाच्या हिरवळीवर स्वागत समारोहाचे (ऍट होम रिसेप्शन) आयोजन केले होते. यावेळी राज्यपाल व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांनी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वागत समारोहाला खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथील कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी व प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनील भिरूड व कुलसचिव प्रा. दयाराम सोनवणे, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा, न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासह सशस्त्र दल तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रगान, राष्ट्रगीत व राज्यगीताने स्वागत समारोहाची सुरुवात झाली तर चहापानानंतर राष्ट्रगान व राष्ट्रगीताने समारोहाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments