Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*‘पुणे फेस्टिव्हलची उंची अधिक वाढेल’* *- चंद्रकांतदादा पाटील*

*‘पुणे फेस्टिव्हलची उंची अधिक वाढेल’* *- चंद्रकांतदादा पाटील*

पुणे फेस्टिव्हल या पुण्याचे नाव जगभर नेणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची उंची अधिक वाढेल हा विश्वास मला आहे. या दृष्टीने पुणे फेस्टिव्हलच्या अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाली, या पदास मी निश्चित न्याय देईन. पुणे फेस्टिव्हलची अनेक वैशिष्ट्ये असून अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी या प्रदीर्घकाळ पुणे फेस्टिव्हलमध्ये आपला नृत्याविष्कार सादर करतात, असे वैशिष्ट्य कोणत्याच महोत्सवात दिसणार नाही. पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात वर्षभर होत रहावेत, तसेच कोल्हापूरला प्रकाशझोतात नसणारी ८४ स्थळे शोधून ती बघण्याचा विशेष कार्यक्रम कोल्हापूरला केला होता तसाच प्रयत्न पुण्यातील प्रकाशझोतात नसणारी स्थळे शोधून ती बघण्याची सुविधा निर्माण व्हावी असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे फेस्टिव्हल अॅडव्हायजरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर पुणे फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल प्राईड येथे पुण्यातील कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सणस, सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, बालगंधर्व कार्यक्रम प्रमुख व विश्वस्त मोहन टिल्लू यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर व सत्यशील देशपांडे यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला.

पुण्यातील नामवंत कलावंत, शिक्षण तज्ञ, साहित्यिक, कवी, कार्यक्रमांचे संयोजक या बैठकीत मोठ्या संखेने सहभागी झाले होते. पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, शाम भुरके, सुचेता भिडे चापेकर, स्वाती दैठणकर, राहुल सोलापूरकर, शारंगधर साठे, राजेंद्र बर्वे, डॉ. संगीता बर्वे, हमेंत मावळे, वीरेंद्र चित्राव, राजीव बर्वे, प्रदीप निफाडकर, रघुनंदन पणशीकर, अनुराधा राजहंस, चारुशीला केळकर, सुचेता अवचट, जया जोग, ऋषिकेश देशपांडे, आभा आवटी, विजय मागीकर, सुनील महाजन, मिलिंद तुळणकर, डॉ. देविका बोरठाकुर, सचिन हिंगणेकर, निकिता मोघे, नीलिमा राडकर, धनंजय गोखले यांसह ५० हून अधिक कलावंत यात सहभागी झाले होते.

प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सर्वांचे स्वागत केले व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे फेस्टिव्हलच्या अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर होणारा यंदाचा ३८ वा पुणे फेस्टिव्हल तेव्हढाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. नवीन कलावंत नव्या कल्पनांसह सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे.

पुणे फेस्टिव्हल हा सांस्कृतिक महोत्सव आपला प्रत्येकाचा असून नवीन कलावंतांना त्यात सहभागी होता यावे यासाठी हा कलावंतांचा मेळावा असल्याचे पुणे फेस्टिव्हलचे सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.

कलावंतांच्या या मेळाव्यात अनेक कार्यक्रम सुचवले गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले. स्नेहभोजनानंतर मेळाव्याची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments