Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस ऑफ आर्किटेक्चरच्या 66 व्या वार्षिक डिझाईन स्पर्धेत बीएनसीएच्या...

नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस ऑफ आर्किटेक्चरच्या 66 व्या वार्षिक डिझाईन स्पर्धेत बीएनसीएच्या विद्यार्थिनींचे यश *बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या मुलांसाठी टाकाऊ साहित्यापासून तयार केली विशेष बांधकाम रचना

पुणे,१ एप्रिल 2024 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन (बीएनसीए) च्या विद्यार्थिनींच्या संघाने नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस ऑफ आर्किटेक्चर इंडिया (नासा) च्या नुकत्याच झालेल्या 66 व्या वार्षिक डिझाईन स्पर्धेत विशेष उल्लेख पुरस्कार (चौथा क्रमांक) पटकावला. हा सोहळा केरळ येथील एरनाड नॉलेज सिटी येथे नुकताच पार पडला. देशभरातील सर्वोत्कृष्ट 284 संघांपैकी ५१ संघाना पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले. त्यात बीएनसीएच्या संघाने हे यश मिळविले.

यावर्षी स्पर्धेचा विषय हा नाविन्यपूर्ण जागा निर्माण करण्यासाठी टाकाऊ साहित्याचा पुर्नप्रयोग करण्याच्या परिवर्तनीय क्षमतेचे प्रदर्शन दर्शविण्याभोवती केंद्रित होता.पुण्यातील चालू बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या मुलांचे संगोपन व वावरासाठी एक विशेष बांधकाम रचना करण्यात आली.या प्रकल्पाला आश्रय हे सुयोग्य नाव देण्यात आले व याला वाणी प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा प्रा. लि. व श्री साईराज बिल्डकॉन यांचे समर्थन लाभले.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांनी विद्यार्थिनींच्या संघाचे अभिनंदन केले.ते म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये उपायाभिमुख विचार आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनाशी ही कामगिरी सुसंगत असल्याने महत्त्वपूर्ण आहे.यामुळे विद्यार्थिनींनीमध्ये अभिनवता आणि सर्जनशीलतेची संस्कृती वाढेल.प्रा.महेश बांगड म्हणाले की,आमच्या कार्यामध्ये केवळ संकल्पनाच नाही तर आमच्या प्रकल्पाचे भौतिक बांधकाम,उपयोग आणि दस्ताऐवजीकरण देखील समाविष्ट होते.या गरजा पूर्ण करण्यासाठी बीएनसीएच्या 80 विद्यार्थिनींच्या संघाने सहकार्य करत उत्कृष्ट कामगिरी दर्शविली.

विद्यार्थिनींच्या संघाने अर्थबॅग तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरविले,जी विशेष करून बांधकामाच्या दरम्यान निर्माण झालेला ढिगार्‍यासारखे टाकाऊ साहित्य पुन्हा वापरणारी शाश्‍वत बांधकाम पध्दत आहे.पर्यावरणपूरकता आणि संसाधनांचा योग्य वापर या बीएनसीएच्या वचनबध्दतेशी हा निर्णय सुसंगत होता.हे टाकाऊ साहित्य पुण्यातील बालेवाडी भागात सुरू असलेल्या श्री साईराज बिल्डकॉन यांच्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजूरांच्या मुलांसाठी विशेष बांधकाम रचना करण्यासाठी वापरले गेले.या बांधकामामध्ये स्टील बार्सने मजबूत केलेली अखंड भिंत आणि षटकोनी,लाकडी चौकट व वेस्ट फ्लेक्स मटेरियल वापरून तयार केलेेले छप्पर यांचा समावेश होता.जमिनीच्या पृष्ठभागासाठी शाश्‍वत बांधकाम पध्दतींचा अवलंब करत शेणाच्या थरांचा वापर करण्यात आला.याचबरोबर सभोवतालच्या भागात सुमारे 700 सिमेंटच्या पिशव्यांसह या विशेष संचरनेला गोलाकार देण्यात आला.

या प्रकल्पाचे नेतृत्व युनिट सेक्रेटरी सुदीक्षा अनंथरामन,युनिट डिझाईनी तृप्ती थापा यांनी प्रा.महेश बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली केले.या प्रकल्पाबरोबरच नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस ऑफ आर्किटेक्चर इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त डोनेशन ड्राईव्ह हा विशेष उपक्रमाद्वारे जुनी खेळणी,पुस्तके,कपडे हे बांधकाम मजूरांच्या मुलांसाठी गोळा करण्यात आले. ही विशेष बांधकाम संरचना वायरलेस लायटिंगसह पूर्ण करण्यात आली.या प्रकल्पाच्या प्रक्रियेचे चित्रिकरण करून दस्ताऐवजीकरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments