पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
मराठी भाषेच्या अभ्यासक आणि ख्यातनाम व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने आपण अखेरपर्यंत कार्यरत राहिलेल्या एका विदुषीला मुकलो आहोत.अशा शब्दात आदरांजली वाहिली आहे मराठी भाषा,साहित्य आणि संस्कृतीशी एकरूप झालेल्या प्रा. शेख यांनी मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात दिलेले योगदान फार मोलाचे आहे. त्यासाठी त्या नेहमी आग्रही असत. मराठी विभाग प्रमुख म्हणून महाविद्यालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यानी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्याना मार्गदर्शन सुरूच ठेवले होते,त्यातील अनेक आय ए एस विद्यार्थी आज प्रशासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. मराठी भाषिक समाज त्यांचे हे सारे योगदान नेहमीच आठवणीत ठेवेल. मी त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करतो .
ना. चंद्रकांतदादा पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य
ख्यातनाम व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना ना. चंद्रकांत पाटील यांची आदरांजली
RELATED ARTICLES


