गुरूग्राम,25 ऑगस्ट 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने आज ईव्ही चार्जिंग सेवा आणि सोल्युशन्स पुरवठादार असलेली आघाडीची कंपनी जिओ – बीपी सोबत भागीदारीची घोषणा केली. याअंतर्गत दोन्ही कंपन्यांचे ईव्ही चार्जिंग नेटवर्क्स एकत्रित करून भारतभरातील ईव्ही वापरकर्त्यांसाठी चार्जिंगची सुलभता वाढवणे आहे.या सहयोगामुळे ईव्ही ग्राहक मायह्युंदाई ॲपचा वापर करून जिओ – बीपी पल्स चार्जिंग स्टेशन्स शोधून त्याचा वापर करू शकतील.यामुळे चार्जिंगची सुविधा आणि उपलब्धता अधिक वाढेल. जिओ – बीपी पल्स नेटवर्क बरोबर एकत्रीकरणामुळे एचएमआयएलच्या ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिम मध्ये भारतभरात 37,000 हून अधिक चार्जिंग पॉईंटस उपलब्ध झाले आहेत. एचएमआयएलचे उच्च क्षमतेचे चार्जर्स देखील टप्प्याटप्प्याने जिओ – बीपी पल्स चार्ज प्रो ॲप मध्ये समाविष्ट केले जातील.
ईव्ही चार्जिंग नेटवर्कसाठी ह्युंदाई मोटर इंडिया आणि जिओ – बीपी यांच्यात हातमिळवणी
RELATED ARTICLES


