Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedबँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाने निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न जास्त दिवस प्रलंबित ठेवू नये."...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाने निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न जास्त दिवस प्रलंबित ठेवू नये.” — महाराष्ट्र बँकेचे माजी कर्मचारी व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे बँक व्यवस्थापनास आवाहन. –बँकेतील ८० कर्मचाऱ्यांचा अमृत महोत्सवी सत्कार.

पुणे
( प्रतिनिधी )
भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन ह्या निवृत्त बँक कर्मचारी संघाच्या वतीने पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ऐंशी कर्मचारी,अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.”निवारा” मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर जे बँक ऑफ महाराष्ट्र चे माजी बँक कर्मचारी आहेत त्यांची ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.त्यांचाही पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार ह्यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर यांनी पाहुण्याचे स्वागत केले व संघटनेच्या विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली.राजगड तालुक्यातील दुर्गम गुहिनी गाव दत्तक घेतल्याची माहिती तसेच “सामाजिक कृतज्ञता निधी” चे समर्पण आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांचे झाले असल्याची माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना कार्यकारी संचालक सुशांत कुमार मोहंती म्हणाले,”महाराष्ट्र बँकेतील कुटुंब निवृत्ती धारकांची संख्या तीन हजार आठशे इतकी असून निवृत्तधारक बारा हजारच्या वर आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे ह्यावेळी नमूद केले.बँकेचा व्यवसाय एकोणीस टक्क्यांनी वाढला असून सात हजार कोटींचा नफा झाला आहे”
महाराष्ट्र बँकेचे माजी कर्मचारी व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापनाने बँक निवृत्तधारकांचे प्रश्न जास्त काळ प्रलंबित ठेवू नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.निवृत्ती धारकांनी आपले जीवन आनंदी वातावरणामध्ये जगावे म्हणजे मन:शांती मिळेल.तरुणांशी संवाद साधत जावा म्हणजे नैराश्याची भावना दूर होईल.”
व्यासपीठावर मोहन घोळवे,प्रकाश जावडेकर,बाळासाहेब फडणवीस,भास्कर माणकेश्वर यांची मुख्य उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातीस चंद्रशेखर बोरोळे यांनी श्रमिक गीत गायले.मधुकर शिधये यांनी शंख वादन केले.सूत्र संचलन वीणा इतराज व शुभांगी कुलकर्णी ह्यांनी केले.सुमेधा दफ्तरदार यांनी पसायदान गायले.संघटनेचे अध्यक्ष मोहन घोळवे यांनी आभार मानले.
—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments