कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या नावीन्यपूर्ण साहित्याची ओळख पटवणे, त्यांची चाचणी घेणे आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध करणे या गोष्टी गोदरेज प्रॉपर्टीजचा (GPL) हा सीएसआर (CSR) उपक्रम करेल
मुंबई 27 ऑगस्ट 2026: गोदरेज प्रॉपर्टीज (GPL) ने झायन्टिओ सोबत, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या गुड अँड ग्रीनची नावीन्यपूर्ण शाखा असलेल्या गोदरेज गुड अँड ग्रीन लॅब्स अंतर्गत हॅबिटॅट मॅटर्स सुरू करण्याची घोषणा आज केली. भारतातील बांधकाम क्षेत्रात कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर वाढवणे हा या सीएसआर उपक्रमाचा उद्देश आहे.
जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत सध्या बांधकाम तेजीच्या सर्वात मोठ्या टप्प्यात आहे. 2050 पर्यंत, देशात 35 अब्ज चौरस फुटांपेक्षा जास्त नवीन बांधकाम क्षेत्र निर्माण होण्याची अपेक्षा आहे, जे आजच्या बांधकाम क्षेत्राच्या दुप्पटीहून अधिक आहे. या कालावधीत बांधली जाणारी प्रत्येक इमारत, बांधल्या क्षणीच आपला पर्यावरणीय ठसा निश्चित करते, ज्यामुळे आजच्या बांधकाम साहित्याची निवड हा एक असा निर्णय ठरतो, ज्याचे परिणाम कधीही बदलता येणार नाहीत.
प्रत्येक भिंत तयार करणारे सिमेंट, काँक्रीट, स्टील, काच आणि ब्लॉक्स यांचा बांधकामावरील कार्बन परिणामात मोठा वाटा असतो आणि या उद्योगातील सर्वात दुर्लक्षित आव्हानांपैकी हे एक आहे. आश्वासक, कमी-कार्बन सामग्रीच्या नवकल्पना आणि प्रत्यक्ष बांधकाम प्रकल्पावर त्यांची अंमलबजावणी यांमधील दरी कमी करण्यासाठी हॅबिटॅट मॅटर्स हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी विश्वासार्ह नवकल्पना ओळखणे, त्यांची प्रायोगिक चाचणी घेणे आणि वास्तविक परिस्थितीत त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे, हे उद्दिष्ट आहे.
पुढील पाच वर्षात, गोदरेज प्रॉपर्टीज अशा प्रायोगिक चाचण्या राबवण्याचे आणि प्रमाणित, प्रत्यक्ष पुराव्यांचा एक संग्रह तयार करण्याचे ध्येय ठेवत आहे, जो भविष्यात संपूर्ण बांधकाम उद्योगाला मार्गदर्शन करू शकेल.
“भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात शाश्वततेच्या बाबतीत गोदरेज प्रॉपर्टीज नेहमीच आघाडीवर राहिली आहे आणि हॅबिटॅट मॅटर्स हे त्या दिशेने टाकलेले आणखी एक पुढचे पाऊल आहे. आशादायक कल्पना आणि प्रत्यक्ष साइटवर त्याची अंमलबजावणी यातील दरी सांधणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाद्वारे, नवोन्मेषकांना अभियांत्रिकीच्या दृष्टीने तांत्रिक सखोलता, तसेच प्रत्यक्ष साइटवर आणि गतिमान वास्तविक परिस्थितीमध्ये आपल्या कल्पनांची चाचणी घेण्याची संधी मिळते; यातून होणारे मूल्यमापन उद्योगासाठी नवीन मानके प्रस्थापित करण्यास मदत करेल,” असे गोदरेज प्रॉपर्टीजचे चीफ डिझाइन अँड सस्टेनेबिलिटी ऑफिसर रोहित मोहन यांनी सांगितले.
“भारताच्या विकासाची गाथा पुढील दशकात आपण बांधकाम कसे करतो याबद्दलच्या आपल्या निवडींवर अवलंबून असेल. गुड अँड ग्रीन लॅब्समध्ये, आम्ही अशा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहोत, ज्या या उद्योगाने अद्याप सोडवलेल्या नाहीत, आणि कमी-कार्बन उत्सर्जन करणारे बांधकाम साहित्य ही त्यापैकीच एक मोठी समस्या आहे. या समस्या स्वतंत्रपणे सोडवण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही; आम्ही पाठिंबा देत असलेला प्रत्येक उपाय, त्यामागील विज्ञान आणि जमिनीवरील वास्तव समजणाऱ्या लोकांच्या भागीदारीतून तयार केला जातो. व्यापक रिअल इस्टेट परिसंस्था स्वीकारू शकेल, त्यांचा विस्तार करू शकेल आणि संपूर्ण उद्योगाला पुढे नेऊ शकेल, असे उपाय तयार करणे हे आमचे ध्येय आहे.” असे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या गुड अँड ग्रीन विभागाचे प्रमुख पाक्झान दस्तूर म्हणाले.
झिन्टेओचे भागीदार सुमन जगदेव म्हणाले, “कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या साहित्याच्या बाबतीत भारतासमोर नावीन्यपूर्ण संशोधनाची समस्या नाही, तर प्रामुख्याने अंमलबजावणी आणि स्वीकारार्हतेची आव्हाने आहेत. हॅबिटॅट मॅटर्स बाजारपेठेतील हा अभाव असलेला दुवा सांधते; आशादायक उपाययोजनांना हे व्यासपीठ प्रत्यक्ष बांधकाम प्रकल्प आणि प्रत्यक्ष कार्यस्थळांवरील परिस्थितीशी जोडते, तसेच त्यासोबत त्याला पोषक धोरणांची साथही मिळते. सिद्ध झालेल्या कामगिरीच्या आधारे व्यावसायिक विश्वासार्हता निर्माण करण्यास मदत करते आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी शक्य करणारा पाया रचते.”
हॅबिटॅट मॅटर्सने अर्जांसाठी विनंती (RFA) सुरू केली असून, स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था, सामग्री उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले
पाच प्राधान्यक्रमाच्या सामग्री श्रेणींवर — सिमेंट, काँक्रीट, पोलाद, ब्लॉक्स आणि काच — तसेच जैव-आधारित पर्याय आणि एम्बॉडीड कार्बन कमी करण्यासाठीच्या इतर अंमलबजावणीयोग्य उपायांवर हा उपक्रम लक्ष केंद्रित करतो. TRL 5 आणि त्याहून अधिक प्रगत टप्प्यावरील नावीन्यपूर्ण उपाय यासाठी पात्र आहेत. निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या नावीन्यपूर्ण उपायांची प्रत्यक्ष बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रायोगिक अंमलबजावणी करण्याची संधी मिळेल आणि त्यांचा स्वीकार वाढवण्यासाठी त्यांना पद्धतशीर तांत्रिक व व्यापारीकरण विषयक सहाय्य दिले जाईल.
जास्तीत जास्त पाच स्लाईड्सच्या स्वरूपात (PPT किंवा Word फाइल) 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत Habitat.Matters@xynteo.com येथे अर्ज सादर करावेत.


